Saturday, July 6, 2024

सई लोकूरच्या चाहत्याने तब्बल ५० वेळा पाहिला ‘हा’ व्हिडिओ, नक्की आहे तरी काय यात?

बिग बॉस मराठी १’ फेम आणि बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे सई लोकूर होय. सई लोकूर ही चित्रपटासोबत सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. ती तिच्या पतीसोबत देखील अनेकवेळा फोटो शेअर करत असते. अशातच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

सईने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, तिने काळ्या रंगाची साडी नेसली आहे. यावर तिने ऑक्साईड ज्वेलरी घातली आहे. तिने या व्हिडिओमध्ये चांगलच साज-शृंगार केला आहे. तसेच केसात गजरा माळला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ती सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग असणारे ‘मेरा यार’ या गाण्याच्या स्टेप्स फॉलो करताना दिसत आहे. (sai lokur share her dance video on social media)

हा व्हिडिओ शेअर करून तिने “हे सध्या ट्रेंडिंग आहे,” असे कॅप्शन दिले आहे. तिच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “खूप सुंदर ! कमीत कमी ५० वेळा बघितला.'” तसेच बाकी अनेक चाहते या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

सई ही ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सीझनमध्ये स्पर्धक होती. या शोमध्ये ती फिनालेपर्यंत गेली होती. पण ती हा शो जिंकू शकली नव्हती. त्यानंतर ती खूप चर्चेत आली. या शोने तिला खरी ओळख मिळाली. बिग बॉसच्या घरात असताना तिची आणि पुष्कर जोगची मैत्री खूप चर्चेत आली होती. २०२१ मध्ये तिने तीर्थदीप रॉय याच्याशी थाटात विवाह केला. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तिने शेअर केले होते.

सई लोकूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘किस किस को प्यार करू’, ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘जरब’, ‘कुछ तुम कहो कुछ हम कहे’, ‘मी आणि तू’, ‘स्माईल प्लिज’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा