‘बिग बॉस मराठी’ फेम आणि बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे सई लोकूर होय. सई लोकूर ही चित्रपटासोबत सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. ती तिच्या पतीसोबत देखील अनेकवेळा फोटो शेअर करत असते. अशातच सईने तिचे साडीवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहेत.
सईने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, सईने लाल आणि आकाशी रंगाची साऊथ इंडियन स्टाईल साडी घातली आहे. सोबत काही दागिने घातले आहेत. हातात बांगड्या, कपाळी टिकली तसेच केसात गजरा घातला आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. अनेकजण तिच्या या फोटोवर कमेंट करत आहेत. तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “साडी नाहीतर तर तू खूप छान आहेस.” तसेच बाकी अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत.
सईने डिसेंबर २०२० मध्ये तीर्थदीप रॉय याच्याशी लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. आजकाल सई सोशल मीडियावर नेहमीच तिचे फोटो व्हिडिओ शेअर करत असते. त्यामुळे तिचे चाहते देखील खूप खुश आहेत. (sai lokur’s saree look photo viral on social media)
सई ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये स्पर्धक होती. या शोमध्ये ती फिनालेपर्यँत गेली होती. पण ती हा शो जिंकू शकली नव्हती. त्यानंतर ती खूप चर्चेत आली. या शोने तिला खरी ओळख मिळाली. बिग बॉसच्या घरात असताना तिची आणि पुष्कर जोगची मैत्री खूप चर्चेत आली होती.
सई लोकूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘किस किस को प्यार करू’, ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘जरब’, ‘कुछ तुम कहो कुछ हम कहे’, ‘मी आणि तू’, ‘स्माईल प्लिज’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज










