मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले मेजर उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यावर बनलेला ‘मेजर’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच सर्वत्र चर्चेमध्ये आहे. चित्रपटाच्या पोस्टरपासून ते टिझरपर्यंत सगळ्या गोष्टी खूपच चर्चेत आहेत. या चित्रपटातील सई मांजरेकर हिच्या लूकबद्दल देखील सर्वत्र चर्चा चालू आहे. सई मांजरेकर या चित्रपटात मेजर उन्नीकृष्णन यांच्या पत्नीची भूमिका निभावणार आहे. त्यामुळे तिचा लूक कसा असेल याबाबत सगळ्यांनाच खूप उत्सुकता होती. सई मांजरेकरचा या चित्रपटातील लूक समोर आला आहे. तिचा हा साधा लूक प्रेक्षकांना खूपच आवडला आहे.
सई मांजरेकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी आहे. सईने या चित्रपटात 16 वर्षापासून ते 28 वर्षापर्यंतचे पात्र निभावले आहे. मेजर हा चित्रपट हिंदी आणि तेलुगु या दोन भाषांमध्ये असणार आहे. यासाठी सई तेलुगु भाषा शिकली आणि स्वतः सगळे डायलॉग म्हटले. या चित्रपटात सईसाठी कोणत्याही व्हॉईस ओव्हर आर्टिस्टची गरज लागली नाही. तिने स्वतः खूप मेहनतीने आणि तिचे पात्र समजून घेऊन काम केले आहे.
सईची ही मेहनत आणि चिकाटी पाहून चित्रपटाचे निर्माते तिच्यावर खूप खुश आहेत. त्यामुळेच सई त्यांची या पात्रासाठी पहिली निवड होती. या चित्रपटाचा टिझर 12 एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे.
या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता अदिवी सेष हा मेजर उन्नीकृष्णन यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
मेजर हा चित्रपट 2 जुलै, 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात सोभिता धुलिपाला, सई मांजरेकर, प्रकाश राज हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सशी किरण टिक्का यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे प्रॉडक्शन सोनी पिक्चर्स फिल्म इंडिया करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बॉलिवूड अभिनेता संजय कपूरच्या मुलीने शेअर केला बेली डान्स व्हिडिओ, पाहा झक्कास ठुमके