Thursday, June 26, 2025
Home साऊथ सिनेमा साई पल्लवीने नाकारली चिरंजीवींच्या चित्रपटाची ऑफर; यावर त्यांची रिऍक्शन पाहून अभिनेत्रीही झाली स्तब्ध

साई पल्लवीने नाकारली चिरंजीवींच्या चित्रपटाची ऑफर; यावर त्यांची रिऍक्शन पाहून अभिनेत्रीही झाली स्तब्ध

सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या अभिनयापेक्षा आपल्या व्यक्तीमत्त्वामुळे अधिक प्रसिद्ध असतात. अशीच एक अभिनेत्री आहे, साई पल्लवी. तिने अगदी कमी कालावधीत दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपली खास जागा निर्माण केली आहे. मिळालेल्या सगळ्याच भुमिका न स्वीकारता, मोजक्या आणि निवडक भुमिका करणे तिला पसंत आहे. आपले सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर तिने भलामोठा चाहतावर्ग कमावला आहे.

साई पल्लवी सध्या नागा चैतन्यसोबत तिच्या ‘लव्ह स्टोरी’ या आगामी चित्रपटाबद्दल चर्चेत आहे. रविवारी (१९ सप्टेंबर) या सिनेमाचा प्री-रिलीझ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यात बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खान आणि मेगास्टार चिरंजीवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या दरम्यान, चिरंजीवी यांनी साई पल्लवीसोबत स्टेज शेअर केला आणि अभिनेत्रीने नाकारलेल्या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया देखील दिली, जे पाहून साई हैराण झाली. (sai pallavi denied chiranjeevis sister role in bhola shankar see actor reaction)

वास्तविक, चिरंजीवी यांनी त्यांच्या आगामी ‘भोला शंकर’ चित्रपटात साई पल्लवीला त्यांच्या बहिणीची भूमिका ऑफर केली होती, जी करण्यास अभिनेत्रीने नकार दिला. आता ‘लव्ह स्टोरी’च्या खास इव्हेंटमध्ये अभिनेत्याने यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे, जे पाहून अभिनेत्री स्वतः देखील चकित झाली.

चित्रपट नाकारण्याबाबत चिरंजीवी साई पल्लवी समोर म्हणाले की, “मी साईसोबत एक चित्रपट करणार होतो, ज्यात ती माझ्या बहिणीची भूमिका साकारणार होती. माझी इच्छा होती की तिने ती करावी, पण तिने ऑफर नाकारली. तिचा निर्णय ऐकून मला आनंद झाला. कारण पुढच्या चित्रपटात तिच्यासोबत डान्स नंबर करण्याची संधी मी गमावू शकत नव्हतो.”

कार्यक्रमात चिरंजीवींची प्रतिक्रिया पाहून खुद्द साई पल्लवीही हैराण झाली होती. यावर तिने पटकन माईक घेतला आणि चित्रपट नाकारण्याचे कारणही सांगितले. ती म्हणाली की, “मी रीमिक्समध्ये काम करायला घाबरत होते. याच कारणामुळे मी चित्रपटात काम करण्यास नकार दिला, नाहीतर मी त्यांच्यासोबत काम करण्याची इतकी चांगली संधी का सोडली असती. जेव्हाही मी कुठेही जाते, मला पहिला प्रश्न विचारला जातो की, मी तुम्हाला कधी भेटले आहे का? जेव्हा मी परत एकदा राम चरणला भेटले, तेव्हा मी विचार केला की मी तुम्हाला कधी भेटेल आणि जर मी तुझ्याबरोबर काम केले, तर ती माझ्यासाठी खूप सन्मानाची बाब असेल.

यानंतर चिरंजीवींने साईला थांबवले आणि म्हणाले की, “जेव्हा मी रंभा, राधा आणि श्रीदेवी यांच्यासोबत नाचायचो, तेव्हा मला एक किक मिळत असे. आता मला वाटते की मी तुझ्याबरोबर नाचून अशी किक मिळवू शकतो. मला हे सिद्ध करायचे आहे की, मी एक डान्सर देखील आहे.” हे ऐकुन साई पल्लवीला अश्रू अनावर होतात.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाळेची फी भरण्यासाठी गुलशन ग्रोव्हर यांनी विकली डिटर्जेंट पावडर, मोठ्या संघर्षाने झाले बॉलिवूडचे ‘बॅडमॅन’

-कपूर घराण्याचे पाश तोडत केली बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तर ‘या’ कारणामुळे बेबोने राकेश रोशन यांना दिला होता डच्चू

-‘कन्यादाना’बद्दल बोलणे ‘बबली गर्ल’ला पडले भलतेच महागात, सोशल मीडियावर व्यक्त होतोय संताप

हे देखील वाचा