Wednesday, July 3, 2024

आयफावारी करणाऱ्या सई ताम्हणकरच्या लूकने फॅन्सला झाली mermaid ची आठवण, पाहा तिच्या या लूकमधील फोटो

मराठी सिनेविश्वातील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री असलेली सई ताम्हणकर नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. सईने स्वतःला नुसते मराठी पुरतेच मर्यादित न ठेवते साऊथ आणि बॉलिवूडमध्ये देखील तिने तिच्या अभिनयाचा झेंडा फडकावला आहे. मागच्या यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘मिमी’ या सिनेमात सईने सहायक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे खूपच कौतुक झाले आणि तिने वाहवा देखील प्रचंड प्रमाणात मिळवली. सध्या मनोरंजनविश्वात आयफा पुरस्कारांचे वारे वाहत आहे. सर्वत्र याच पुरस्कारांची चर्चा आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये सई ताम्हणकरने अटकेपार झेंडा लावत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे.

आयफा पुरस्कार सोहळ्याच्या एका समारंभात सईच्या लूकने तुफान लक्षवेधून घेतले. सोशल मीडियापासून बॉलिवूडपर्यंत सर्वांच्याच चर्चेत सईचा लूक होता. सईने सोशल मीडियावर तिच्या या लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने ब्लॅक ब्लाऊज, व्हाईट झगमगता घेर असलेला मोठा स्कर्ट आणि वेस्टर्न ज्वेलरी आणि ऍक्सेसरीज असा लूक केला असून यात अति खूपच ग्लॅमरस आणि आकर्षक दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून अनेकांना mermaid ची आठवण झाली असून त्यांनी अशा कमेंट्स देखील केल्या आहेत. सईने तिच्या या लूकमधील समुद्राचे बॅकग्राउंड असलेले फोटो आणि एक रील शेअर केले आहे.

सईने तिचा हा लूक फॅशन डिझायनर असलेल्या साईशा शिंदेने डिझाइन केला असून हा ड्रेस तिने या सोहळ्यात घातला होता. सईने लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘मिमी’ या सिनेमात कृती सेननच्या मैत्रिणीची शमाची भूमिका साकारली होती. या भूमिकेत तिने प्रचंड मेहनत करून तिची छाप प्रेक्षकांवर सोडली. नुकतीच सईची ‘पेट पुराण’ ही वेबसिरीज प्रदर्शित झाली असून, यात ती ललित प्रभाकरसोबत दिसत आहे. याशिवाय तिची B E रोजगार नावाची युट्युब सिरीज सुद्धा भाडीपा चॅनेलवर चालू आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सेट मॅक्सवरील हक्काचा सिनेमा म्हणून ओळखल्या जाणारा ‘सूर्यवंशम’ आता ‘या’ चॅनेलवर दिसणार

IIFA Rocks 2022: ‘सरदार उधम’ने तीन, ‘अतरंगी रे’ने जिंकले दोन पुरस्कार

आयफा २०२२ पुरस्काराच्या विजेत्यांची नावे आली समोर, जाणून घ्या कोणाला मिळाला कोणता पुरस्कार

हे देखील वाचा