मराठी मनोरंजनविश्वातील बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. मधल्या काही काळापासून मराठी चित्रपटांपासून लांब असलेली सई महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेतून नेहमीच प्रेक्षकांना भेटत असते. सई अभिनयासोबतच तिच्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते. सोहळा मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच तिचे विविध आऊटफिटमधील फोटो शेअर कट असते. ती तिच्या या लुकणमुळे नेहमीच मीडियाच्या आणि नेटकऱ्यांच्या चर्चेत असते.
आता पुन्हा एकदा सई तिच्या एका नवीन आणि हटके लूकमुळे लाइमलाईट्मधे आली आहे. सईने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने वेस्टर्न ड्रेस घातलेला दिसत आहे. यात तिने ऑफ शोल्डर शिमरी ड्रेस परिधान केला असून, यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या लुकसाठी सईने शिमरी ड्रेस परिधान केला असून या ड्रेसवर फुलांची डिझाइन देखील करण्यात आली आहे. ही फुलं पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या शिमरी पॅटर्नमध्ये आहेत. तर या ड्रेसला एका बाजूलाच बाह्या असून दुसरी बाजू ऑफ शोल्डर स्लिव्ज आहे.
View this post on Instagram
सईने तिच्या या ड्रेसवर कानांमध्ये फक्त ब्लॅक अँड व्हाईट रंगाचे टॉप्स घातलेले दिसत आहे. याव्यतिरिक्त तिच्या अंगावर कोणतीही दुसरी ज्वेलरी दिसत नाही. सोबतच तिने मॅट मेकअप करत शिमरी आयशॅडो आणि काजळ वापरले आहे. तर तिने तिचे केस टाय केले आहेत. सईने तिचे हे फोटो होळी आणि जागतिक महिला दिन हे दोन्ही औचित्य साधत पोस्ट केले आहे.
तर नेटकऱ्यांनी देखील सई ताह्मणकारच्या या लूकचे कौतुक केले असून तिचा हा लूक त्यांना आवडल्याचे देखील कमेंट्स मधून सांगितले आहे. तत्पूर्वी मराठीसोबतच सईने बॉलिवूडमध्ये देखील तिचे नाव उंचावले आहे. ‘मिमी’ या सिनेमासाठी तिने सहायक व्यक्तिरेखेचे अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
– Womens Day Special: आधुनिक विचाराच्या क्षेत्रात राहूनही ‘या’ अभिनेत्री ठरल्या घरगुती हिंसाचाराच्या बळी