Saturday, July 6, 2024

सई तम्हणकरच्या पोस्टला क्रांती रेडकरची ‘लक्षवेधी कमेंट, सोशल मीडियावर करतेय कतहर…

मराठी सिनेसृष्टीमध्ये बिंदास्त ग्रर्ल म्हणून ओळखली जाणारी सई ताम्हणकर ही आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत भलतची चर्चेत आली. सई सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिने मराठीतच नाहीतर हिंदी चित्रपटातही आपली छाप सोडली आहे. तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्रा अकाउंटवर नुकतंच एक फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे सईने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

सईने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती कोणत्यातरी कलाकाराशी बोलताना दिसत आहे. मात्र, फोटोमध्ये त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही. सईने हा फोटो शेअर करत एक भन्नाट कॅप्शनही दिले होते. सगळ्यांनी अंदाज लावला आहे की, कोणत्यातरी कलाकारशी बोलत आहे. मात्र, पोस्टपेक्षा खरी मजा तर कमेंटमध्ये आहे. सईने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

सईने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “रिअलवाला कॅन्डीड, ओळखा पाहू कोण?” असे लक्षवेधी कॅप्शन पाहून चाहत्यांनीच नाही तर लाकारांनीही प्रतिक्रिया दिला आहे. मात्र, सगळ्यात लक्षवेधी प्रतिक्रिया म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिची ठरली आहे. तिने कमेंटमध्ये लिहिले की, “मी लगेच ओळखलं तू कोणाशी बोलतेस,आपण याविषयी खूप आधी बोललो होतो, तुझ्या डोळ्यातील चमकच सांगतेय तु त्याच्याशीच बोलतेस.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

सईने शेअर केल्या फोटोवर अनेक कमेंट आल्या आहेत मात्र, क्रांतीच्या कमेंटने अनेक लोकांचे लक्ष वेधले आहे, त्यामुळे सई खूपच चर्चेत आली आहे. आता फोटोमागचे रहस्य सांगायचे झाले, तर फोटोमध्ये दिसणारा कलाकार प्रतीक बब्बर (Pratik Babbar) आहे, जो सईसोबत बोलताना दिसत आहे. सई आणि प्रतिक यांचा आगामी येणारा चित्रपट ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटाच्या प्रमोशदरम्यान हा फोटो क्लीक केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक मधूर भांडारकर (Madhur Bhandarkar) यांनी केले असून सई आणि प्रतीक मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटाच्या पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला तेव्हा अवेकांनी सईच्या कपड्यावरुन तिला ट्रोल करण्यास सुरु केले होते. तुम्ही नेहमी मोलकरीनच्याच भूमिका का साकरत असता असा सवाल देखिल सईला विचारला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दक्षिण केरलच्या 32 हजार महिला अपाहरण घटनेला ‘या’ चित्रपटाने दिला ऊजाळा, पाहाच एकदा ट्रेलर
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ‘या’ ठिकाणी अडकणार लग्नबंधनात, समोर आली मोठी माहिती

हे देखील वाचा