Thursday, July 18, 2024

‘हा’ आहे सई ताम्हणकरचा सिक्रेट बॉयफ्रेंड, सोशल मीडियावर केला मोठा खुलासा

सगळेच कलाकार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची माहिती ते नेहमीच सोशल मीडियावर देत असतात. त्यांच्या चाहत्यांना देखील त्यांच्याबाबत जाणून घेण्यासाठी खूप उत्सुकता असते. अशातच अभिनेत्री सई ताम्हणकर देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्याबाबत अनेक गोष्टी ती तिच्या चाहत्यांना सांगत असते. अशातच सोशल मीडियावरील तिची एक पोस्ट जोरदार चर्चेत आली आहे. या पोस्टमधून तिने तिच्या सिक्रेट बॉयफ्रेंडचा खुलासा केला आहे.

सईने (sai tamhankar) इंस्टाग्रामवर एक गाडीवर बसलेला फोटो शेअर केला आहे. ती गाडीच्या बोनेटवर बसलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “मुव्ही नाईट माझ्या कल्पनेतील बॉयफ्रेंडसोबत. ओह ८३ सिनेमा पाहताना तो रडला.” ती एक ड्राइव्ह इन थिएटर ‘८३’ हा चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिने हा फोटो काढलेला आहे. तिची ही पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आहे. अनेकजण या पोस्टवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. (sai tamhankar post viral on social media)

तिच्या या पोस्टवर अभिनेत्री गौरी नलावडे हिने कमेंट केली आहे की, ” तो रडला? मला तर तो आधीपासूनच खूप आवडतो.” एका युजरने म्हटले की, “मी तुझा व्हॉलेंटियर आणि बॉयफ्रेंड बनायला तयार आहे.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “कल्पनेतील प्रियकर ठीक आहे. पण खऱ्या आयुष्यात हॅण्डसम बॉयफ्रेंड का नाही आहे? जे काही तू करते ते छान करते.”

सई ताम्हणकरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘सनई चौघडे’ या चित्रपटांमधून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. सोबत टेलिव्हिजनवर देखील काम केले आहे. तिने ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘अग्निपरीक्षा’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीत खूप वेगाने भरारी घेतली.

हेही वाचा :

‘सेक्रेड गेम्स’च्या तिसऱ्या सीझनसाठी सुरू आहे बनावट कास्टिंग, अनुराग कश्यप यांनी केला मोठा खुलासा

कियारा अडवाणीने सिद्धार्थला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, शुभेच्छा देतांना कियाराने सिद्धार्थला म्हटले…

लदादीदींच्या तब्येतबाबत बहीण आशा भोसलेंनी दिली प्रतिक्रिया, सुधारणेसाठी घरात ठेवली गेली पूजा

 

हे देखील वाचा