Friday, July 5, 2024

‘बोल्ड ऍंड बिनधास्त’ सईचं ग्लॅमरस फोटोशूट, अतरंगी पोझेसने चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका

सिनेसृष्टीत बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. तिने तिच्या ‘बोल्ड ऍंड बिनधास्त’ अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी ती प्रेक्षकांची वाहवा मिळवत असते. अभिनयासोबतच ती तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठीही ओळखली जाते. आपले बोल्ड अन् ग्लॅमरस फोटोशूट ती बऱ्याचवेळा सोशल मीडियावर शेअर करते. आता पुन्हा अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

सईने हे लेटेस्ट फोटोशूट तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलं आहे. या सर्व फोटोमध्ये सईची स्टाईल जबरदस्त दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, यात तिने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे, ज्यात ती अतिशय हॉट दिसत आहे. अभिनेत्रीच्या लूकबद्दल बोलायचं झालं, तर तिने केसांचे कर्ल करून हाय पोनी बांधली आहे. सोबतच या ड्रेसवर तिने काळ्या रंगाचे हाय हिल्स घातले आहेत. (sai tamhankar shared her glamorous photoshoot with fans)

सईच्या या फोटोंची आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. चाहते यावर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्रीची पोझ देण्याची स्टाईल चाहत्यांना वेड लावत आहे. म्हणूनच की काय, या फोटोंचे कमेंट सेक्शन तिच्या कौतुकांनी भरलेले दिसेल. फोटोला आतापर्यंत ५४ हजाराहून अधिक युजर्सने लाईक केले आहे. यापूर्वीही बऱ्याचदा सईने आपल्या अदांनी चाहत्यांना पुरते वेडे करून सोडले आहे.

सई ताम्हणकर तिच्या ‘दुनियादारी’, ‘बालक पालक’, ‘वजनदार’, ‘क्लासमेट’ या चित्रपटांसाठी ओळखली जाते. विशेष म्हणजे तिने ‘हंटर’, ‘गजनी’ या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारून आपली खास ओळख निर्माण केली आहे.

सई ताम्हणकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर ती लवकरच ‘कलरफुल’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात सई मीराच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. ही एक लव्हस्टोरी आहे. तसेच सई ताम्हणकर हिंदी इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘मिमी’ या हिंदी चित्रपटात ती झळकली आहे. यात तिच्यासोबत क्रिती सनॉन मुख्य भूमिकेत होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ मराठी चित्रपटांना तोड नाही! लक्ष्याचे ‘हे’ पाच अफलातून चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

-‘अशी ही बनवा बनवी’ चित्रपटातील ‘शंतनू’ लक्ष्याआधीच जग सोडून गेला, चित्रपती व्ही शांताराम होते त्याचे आजोबा

-‘मैने प्यार किया’ची ३१ वर्षे! लक्ष्याचं बॉलिवूड पदार्पण ते सलमानचं मानधन, वाचा चित्रपटाबद्दल काही रंजक गोष्टी

हे देखील वाचा