Thursday, April 10, 2025
Home मराठी सई ताम्हणकरच्या हटके स्टाईलचा सोशल मीडियावर धुमाकूळ; मात्र चाहत्याच्या ‘या’ कमेंटनेच वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

सई ताम्हणकरच्या हटके स्टाईलचा सोशल मीडियावर धुमाकूळ; मात्र चाहत्याच्या ‘या’ कमेंटनेच वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात बिनधास्त अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. ती नेहमीच तिच्या स्टाईलने आणि एका अनोख्या अंदाजाने सगळ्यांमध्ये चर्चेत असते. अत्यंत साध्या भोळ्या भूमिकांपासून ते अत्यंत बोल्ड आणि डॅशिंग भूमिकेपर्य‌ंत तिने पात्रं‌ निभावली आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनावर तिचा एक वेगळाच ठसा उमटला आहे. सई ताम्हणकर ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नेहमीच‌ तिचे व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून तिच्या चाहत्यांना तिच्याबद्दल माहिती देत असते. तिने आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सई ताम्हणकरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने मल्टी कलरचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. या ड्रेसचे फुल बलून स्लिव्ह्स खूपच सुंदर दिसत आहे. तसेच तिने पिवळ्या रंगाचे इअररिंग्ज आणि पिवळ्या रंगाचे हाय हिल्स घातले आहेत. तिने संपूर्ण केसांना पोनी टेल बांधली आहे. पण तिच्या चेहऱ्यावर आलेली तिच्या केसांची बट तिच्या सौंदर्यात भर पडत आहे. तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. एकाने या फोटोवर अत्यंत मजेशीर अंदाजात पण एकदम लक्षवेधी कमेंट केली आहे. तिच्या एका चाहत्याने लिहिले आहे की, “जगात तीन गोष्टी सर्वाधिक प्रसिद्ध आहेत. नद्यांमध्ये नाईल, नोराची स्माईल आणि आपल्या सईची स्टाईल.” (Sai Tamhankar’s stylish photo viral on social media)

सई ताम्हणकरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘सनई चौघडे’ या चित्रपटांमधून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. सोबत टेलिव्हिजनवर देखील काम केले आहे तिने ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘अग्निपरीक्षा’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीत खूप वेगाने भरारी घेतली. तिने ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘वजनदार’, ‘क्लासमेट’ यांसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. सोबत तिने हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही तिचे कमालीचे नाव कमावले आहे. तिने हिंदीमध्ये ‘हंटर’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने नुकतेच ‘मिमी’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात तिने क्रिती सेनन, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत काम केले आहे. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आता होणार धमाल! प्रेक्षकांचे मनोरंजन करायला ‘या’ पाच मालिका सज्ज; लवकरच झी मराठीवर मारणार दणक्यात एंट्री

-अथिया शेट्टीच्या पोस्टवर अनुष्काने ‘त्या’ गोष्टीवर निशाणा साधत केली भन्नाट कमेंट

-शिवानी सोनारला वाढदिवसाच्या आधीच मिळाले ‘हे’ गिफ्ट, पाहून तुम्हीही कराल अभिनंदन

हे देखील वाचा