Thursday, June 12, 2025
Home मराठी एकदम कडक! सई ताम्हणकरच्या बोल्ड, ग्लॅमरस अन् मादक फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग

एकदम कडक! सई ताम्हणकरच्या बोल्ड, ग्लॅमरस अन् मादक फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग

कलाकारांचा ग्लॅमरस लूक हा चित्रपटांमध्ये जास्त दिसून येत नाही. कारण कथेनुसार त्यांच्या लुकला डिझाइन केले जाते. मात्र कलाकारांचे स्टनिंग आणि क्लासी अवतार आपल्याला त्यांच्या विविध फोटोशूटमध्ये सर्रास पाहायला मिळतात. नेहमीच बॉलिवूडमधील कलाकारांचे फोटोशूट तुफान गाजते. मात्र फोटोशूटच्या बाबतीत मराठी इंडस्ट्रीतील कलाकारही मागे नाही. मराठी सिनेसृष्टीमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक असणाऱ्या आणि मराठीसोबतच बॉलिवूडची गाजवणारी अभिनेत्री सई ताम्हणकर देखील तिचे वेगवेगळे फोटोशूट करत असते.

सई ताम्हणकर मराठी मनोरंजन विश्वातील बोल्ड आणि मादक अभिनेत्री ओळखली जाते. तिच्या हा बोल्ड अवतार तिच्या विविध फोटोशूटमधून नेहमीच बघायला मिळतो. नुकतेच सईने एका आकर्षक फोटोशूट केले असून, त्यातील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोंमध्ये ती अतिशय ग्लॅमरस दिसत असून, तिने या फोटोमध्ये तिने क्रीम कलरचा वन पीस घातला आहे ज्यावर पांढऱ्या रंगाची डिझाइन आहे. तिने तिच्या या लूकमध्ये हिल्स सॅंडल सोडले तर कोणत्या प्रकारची ऍक्सेसरीज घातली नाहीये. तरी ती अतिशय आकर्षक आणि लक्षवेधी दिसत आहे. तिच्या मादक अदांनी तिने सर्वांचं घायाळ केले आहे.

सई ताम्हणकरने कधीही एका भूमिकेच्या चौकटीत न अडकता सतत वेगवेगळ्या भूमिका करत स्वतःला अष्टपैलू अभिनेत्री म्हणून सिद्ध केले आहे. मालिका, सिनेमे, बॉलिवूड या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी सई नुकतीच ‘मिमी’ या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत झळकली होती. तिचा हा सिनेमा चांगलाच गाजला, आणि सोबतच सईच्या भूमिकेचे कौतुक देखील झाले.

सईने आतापर्यंत सनई चौघडे, बे दुणे साडे चार, लालबाग परळ, रिटा, नो एन्ट्री पुढे धोका आहे, धागेदोरे, बालक पालक, दुनियादारी, टाईम प्लिज, मंगलाष्टक वन्स मोर, धुराळा आदी मराठी तर हंटर, मिमी, गजनी, वेक अप इंडिया आदी हिंदी चित्रपटांमध्ये दिसली आहे. लवकरच सईचा ‘मीडिअम स्पायसी’ हा मराठी तर ‘इंडिया लॉकडाऊन’ हा हिंदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी

-राज कुंद्राच्या सुटकेनंतर गहना वशिष्ठने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘तू खूप…’

-‘तो केवळ तरुण अभिनेत्रींसोबतच काम करतो’, सलमानसोबत पुन्हा काम करण्याच्या प्रश्नावर भाग्यश्रीने दिले उत्तर

हे देखील वाचा