Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘आता आम्ही शांत बसणार नाही’, बॉलिवूड चित्रपटांना बॉयकॉट करण्याच्या मागणीवर दिग्गज अभिनेत्याने दिला इशारा

सध्या प्रेक्षकांचा बॉलिवूड चित्रपटांना वाढता विरोध हा चर्चित मुद्दा ठरताना दिसत आहे. आमिर खानच्या लालसिंग चड्ढा चित्रपटाला देशभरात विरोध झाल्यानंतर हा चित्रपट चांगलाच सुपरफ्लॉप ठरला. या चित्रपटाचे अनेक बॉलिवूड कलाकारांनीही कौतुक केले. मात्र लालसिंग चड्ढाचे कौतुक केल्यानंतर अभिनेता ह्रतिक रोशनच्या विक्रम वेधा चित्रपटालाही बॉयकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावरुन होऊ लागली आहे. यावरच अभिनेता अर्जुन कपूरने आपला संताप व्यक्त केला आहे. 

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान सोशल मीडियावर बॉलीवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकणाऱ्या ट्रोलर्सबद्दल उघडपणे आपले मत व्यक्त केले आहे. हा ट्रेंड संपवण्यासाठी सिने क्षेत्रातील लोकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्याने म्हणले आहे., लोक वर्षानुवर्षे सर्वांवर आरोप करत आहेत. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांची धारणा बदलेल असे इंडस्ट्रीतील लोकांना वाटते. मात्र, असे होत नाही. असेही मत यावेळी त्याने व्यक्त केले आहे.

अर्जुन म्हणतो, “आपण सर्वांनी याबाबत मौन बाळगून चूक केली आहे. यावर मौन धारण करून प्रत्येकजण स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावत असताना लोक त्याचा गैरफायदा घेऊ लागले. इंडस्ट्रीतील लोक विचार करतात की त्यांचे काम त्यांच्यासाठी बोलेल. मात्र, आता ट्रोल करणाऱ्यांनी त्याची सवय करून घेतली आहे. आता इंडस्ट्रीतील लोकांनी एकत्र येण्याची आणि याबद्दल मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे. कारण लोक त्याच्याबद्दल जे लिहितात ते सत्यापासून दूर आहे. जेव्हा आपण बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणारे चित्रपट करतो तेव्हा लोकांना ते आपल्या नावामुळे नाही तर चित्रपटामुळे आवडतात. मात्र, आता ते खूप होत आहे आणि ते चुकीचे आहे.”

अर्जुन नुकताच मोहित सूरीच्या ‘एक व्हिलन 2’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात अर्जुनसोबत जॉन अब्राहम, दिशा पटानी आणि तारा सुतारिया देखील होते. हा चित्रपट 2014 मध्ये आलेल्या ‘एक व्हिलन’ या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. याशिवाय अर्जुन आकाश भारद्वाजच्या अनटोल्ड आणि अजय बहलच्या ‘द लेडी किलर’मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा –  अकोल्याचा वैभव पल्हाडे करणार हॉलिवूडच्या अल्बमचे दिग्दर्शन आणि संकलन !

घाईघाईत जॅकेटची चैन लावायला विसरली, कॅमेऱ्यासमोरचं दिशा पटानीची झाली फजिती

स्ट्रगलचे दिवस आठवून दिव्यांका त्रिपाठीची व्यथा; म्हणाली की, ‘मेकर्स म्हणायचे, तुला कोणी पाहणार नाही’

 

हे देखील वाचा