Friday, July 5, 2024

अवघड झालं! बॉलीवूडचा टॉम क्रूझ सैफला चुक भोवली, मागावी लागली चाहत्यांची माफी

सध्या सैफ अली खानला जोरदार टीकेला सामोरे जावे लागत आहे. सैफने नुकतेच एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘आदिपुरुष’ या सिनेमाबद्दल बोलताना तो म्हणाला होता की, ‘या सिनेमात रावणाची मानवीय बाजू दाखवण्यात येणार आहे.’ सैफच्या या वक्तव्यामुळे त्याच्यावर चहूबाजूने टीकेची झोड उठविण्यात आली होती. आता मात्र सैफने त्याच्या या विधानाबद्दल माफी मागत त्याचे विवादित विधान परत घेतले आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटात सैफ नकारात्मक भूमिका निभावताना दिसणार आहे.

सैफने त्याच्या विधानावर माफी मागताना म्हटले, ‘मला समजले की माझ्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. माझ्या विधानामुळे अनेकांच्या भावनांना ठेच पोहचली आहे. पण कोणाच्याही भावनांना इजा पोहचवण्याचा कोणताही हेतू नव्हता. आता मी माझे विधान परत घेत सर्वांची जाहीर माफी मागत आहे. माझ्यासाठी राम हाच सदैव एक हिरो म्हणून राहतील. ‘आदिपुरुष’ हा सिनेमा वाईटावर चांगल्याचा विजयच होतो याच ओळीवर आधारित आहे. आमच्या सिनेमाची संपूर्ण टीम हा भव्य सिनेमा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काम करत आहे.”

सैफ अली खान या चित्रपटात ‘लंकेश’ ही नकारात्मक भूमिका साकारत आहे. तर बाहुबली फेम प्रभास रामाच्या भूमिकेत असणार आहे. याशिवाय अजून कोण कोण कलाकार या चित्रपटात दिसतील याबद्दल अदयाप कोणतीही माहिती नाहीये. ह्या चित्रपटाची शूटिंग अजून चालू झाली नसून सिनेमा ऑगस्ट २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

ओम राऊतच्या दिग्दर्शव करत असलेला ‘आदिपुरुष’ हा सिनेमा घोषणेपासूनच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी जोरदार चर्चेत आहे.

हे देखील वाचा