Tuesday, July 9, 2024

सैफ अली खानला पत्नी करीना कपूर वाटत नाही हॉट, ‘या’ अभिनेत्रीच्या हॉटनेसवर भुरळला अभिनेता

सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) हे बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडपे मानले जाते. सैफला करीनावर जेवढे प्रेम आहे, तेवढीच करीनाही त्याच्यासाठी वेडी आहे. पण सैफला करीना हॉट वाटत नाही. खुद्द अभिनेत्यानेच एका शोमध्ये याचा खुलासा केला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सैफने हे सांगितले तेव्हा करीनाचा एक्स बॉयफ्रेंड शाहिद कपूरही (Shahid Kapoor) तिथे उपस्थित होता.

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहचला होता सैफ
सैफ अली खान हा केवळ अप्रतिम अभिनेताच नाही, तर एक मस्त माणूस देखील आहे. याचा पुरावा देत आम्ही तुम्हाला एक किस्सा सांगतो. खरंतर सैफ अली खान आणि कॅटरिना कैफचा ‘फँटम’ हा चित्रपट रिलीझ होणार होता. त्याच्या प्रमोशनसाठी दोघेही ‘झलक दिखला जा सीझन ८’च्या सेटवर पोहोचले होते. तिथे करण जोहर आणि शाहिद कपूर जजच्या खुर्चीवर बसले होते. करण जोहरनेही सैफ अली खानची मस्करी केली आणि त्याला सर्वात हॉट अभिनेत्री कोणती वाटते असा प्रश्न विचारला. यासाठी त्याने कॅटरिना कैफ, करीना कपूर खान, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा आणि सोनम कपूर असे पर्याय दिले. (saif ali khan do not like kareena this actress is number one)

कॅटरिना वाटते सर्वात हॉट
सैफ अली खान म्हणाला की, कॅटरिना कैफ खूप प्रोफेशनल आहे आणि त्यानुसार तो तिला सर्वात हॉट मानतो. तेव्हा करण आणि बाकीचे स्पर्धक तिथे बसून जोरात हसायला लागले. शाहिदलाही हसू आवरता आले नाही. असे करून करण जोहरने सैफसोबत नॅशनल टीव्हीवर खूप धमाल केली. सैफला आपण काय बोललो ते नंतर समजले आणि करणने पुन्हा तोच प्रश्न केल्यावर तो म्हणू लागला की, त्याला काहीही ऐकू येत नाही.

शाहिदने दाखवला समजूतदारपणा
सैफ अली खानला अडकल्याचे पाहून शाहिद आधीच सावध झाला होता. त्यामुळे जेव्हा शाहिदला हाच प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने पत्नी मीराचे नाव घेत तिला सर्वात हॉट म्हटले. यानंतर त्याने दुसऱ्या क्रमांकावर कॅटरिना कैफचे नाव घेतले. त्याचवेळी कॅटरिना कैफला विचारण्यात आले की, तिला सर्वात सेक्सी कोण वाटतो? शाहिद कपूर, सैफ अली खान, रणबीर कपूर, रणवीर सिंग आणि वरुण धवन हे ऑप्शनमध्ये होते. तिने एकच नाव घेतले आणि ते म्हणजे रणबीर कपूर. तिने रणबीर कपूरचे नाव एकदा नाही तर सलग तीनदा घेतले. हा तो काळ होता, जेव्हा दोघे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते.

हेही वाचा :

हे देखील वाचा