पहिले लग्न सैफला पडले होते भलतेच महागात, घटस्फोटानंतर अमृताला दिले होते ‘इतके’ कोटी रुपये

Saif ali khan give 5 carore to his first wife for get divorce


अभिनेता सैफ अली खान हा नुकताच चौथ्यांदा बाबा झाला आहे. याआधी सैफ आणि करीना याच्या घरी तैमूरचा जन्म झाला होता. करीना ही सैफ अली खानची दुसरी बायको आहे. त्याचे पहिले लग्न अभिनेत्री अमृता सिंग हिच्या सोबत झाले होते. परंतु काही वैयक्तिक कारणामुळे त्यांचा घटस्फोट झाला होता. सैफ हा त्याच्या पहिल्या बायकोपेक्षा 12 वर्षांनी लहान होता.

सैफ हा राहुल रवैल यांच्या चित्रपटाच्या सेटवर अमृताला भेटला होता आणि तिथेच ते दोघे एकमेकांच्या जवळ आले. हळूहळू त्यांची ओळख वाढली, मैत्री झाली आणि ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर 1991 मध्ये त्या दोघांनी लग्न केले. पुढे या जोडीने १३ वर्ष सुखी संसार केला. त्यांना सारा अली खान आणि अब्रहिम अली खान ही दोन मुले आहेत

परंतु लग्नानंतर त्यांचे एकमेकांसोबत पटत नसल्याने त्यांनी परस्पर सामंजस्याने घटस्फोट घेतला. या घटस्फोटासाठी सैफने अमृताला 5 करोड रुपये दिले होते. त्यातील 2.5 करोड त्याने आधी दिले आणि 2.5 करोड घटस्फोट झाल्यानंतर दिले होते. शिवाय इब्राहिम 18 वर्षाचा होईपर्यंत तो प्रत्येक महिन्याला अमृतला 1 लाख रुपये द्यायचा. अमृतासोबत घटस्फोट झाल्यानंतर सैफने 2012 मध्ये करीना सोबत दुसरे लग्न केले.


Leave A Reply

Your email address will not be published.