कलाकार अनेकदा त्यांच्या ग्लॅमरस जगात वावरताना बऱ्याच गोष्टी विसरतात. कलाकार असले तरी ते समाजाचा, देशाचा भाग आहे आणि त्यांना देखील सामान्य लोकांसारखे अनेक नियम आणि अटी लागू असतात, पण त्यांना त्याचा विसर पडल्याचे आपण बघतो. अशा वेळेस लोकांनाच कलाकारांना त्याची आठवण करून द्यावी लागते. असेच काहीसे घडले आहे, बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्यासोबत.
सध्या या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्या व्हिडिओवरून त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. बॉलिवूडमधील पॉवर कपल म्हणून ओळखले जाणाऱ्या सैफ आणि करीना यांच्यामागे सतत मीडियाचा गराडा असतो. त्यांच्या बारीक सारीक बाबी देखील मीडियापासून लपून राहत नाही. नुकतेच सैफ आणि करीना यांना त्यांच्या गाडीत एकत्र पाहण्यात आले. गाडी सैफ चालवत होता आणि करीना त्याच्या बाजूला बसलेली दिसली. अतिशय कॅज्युअल लूकमध्ये दोघेही स्पॉट झाले.
मात्र या व्हिडिओमध्ये नेटकऱ्यांनी सैफिनाची एक मोठी चूक हेरली आणि इतरांच्या देखील निदर्शनास आणून दिली. ती चूक जेव्हा सर्वांच्या लक्षात आली तेव्हा त्यांना सोशल मीडियावर मोठया प्रमाणात ट्रोल करायला सुरुवात झाली आहे. व्हिडिओमध्ये पाहिले तर, सैफ गाडी चालवत असून, करीना त्याच्या बाजूला बसून फोनवर बोलताना दिसत आहे. मात्र या व्हिडिओमध्ये नीट पाहिले तर लक्षात येईल की, दोघांनीही सीट बेल्ट लावला नाहीये. सीट बेल्ट लावणे सुरक्षेच्या दृष्टीने आणि वाहतुकीच्या नियमानुसार बंधनकारक असल्याने त्यांनी केलेली ही चूक आता सैफिनाला चांगलीच डोकेदुखी ठरताना दिसत आहे.
काही नेटकऱ्यांनी तर करीना आणि सैफ यांची पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली, तर काहींनी हा व्हिडिओ शेअर करत मुंबई पोलीस आणि आरटीओ यांना टॅग केले. यासोबतच ‘कलाकारांना सीटबेल्ट लावणे बंधनकारक नाही का?’ असे प्रश्न देखील विचारले जात आहे.
हेही वाचा :
विकी कौशलने साली इसाबेल कैफला दिल्या अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा
अक्षय खन्नासोबत डेब्यू करणार होती बिपाशा, लग्नाआधी केले ‘या’ ३ अभिनेत्यांना डेट