बॉलिवूडचा नवाब खान म्हणजेच ‘सैफ अली खान’ नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. सैफ अली खान हा सध्या चित्रपटांसोबतच, वेब सीरिजमुळे देखील खूप चर्चेत आहे. त्याची काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेली ‘तांडव’ ही सीरिज प्रचंड मोठ्या वादात अडकली होती. सैफसह सीरिजच्या सर्वच कलाकार आणि निर्मात्यांवर अनेक तक्रारी देखील दाखल झाल्या होत्या. सैफने त्याच्या अभिनयाने, त्याच्या दमदार स्टाईल आणि अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. सैफच्या प्रोफेशनल लाईफ सोबतच त्याची पर्सनल लाईफ देखील खुल्या पुस्तकासारखी आहे. त्याने कधीच त्याचे वैयक्तिक जीवन लपवले नाही.
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या लग्नाबद्दल सर्वांनाच सर्व माहिती आहे. आज त्यांचा घटस्फोट होऊन १६ वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. सैफने करीना कपूरसोबत दुसरे लग्न देखील केले असून, ते दोघं लवकरच त्यांच्या दुसऱ्या बाळाचे आई- बाबा होणार आहेत. मात्र, अजूनही सैफ अमृताची एक गोष्ट नेहमी आठवत असतो. किंबहुना अमृताच्या त्या गोष्टींमुळेच आज सैफ इंडस्ट्रीमध्ये टिकून आहे.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान सैफने सांगितले की, “मी घरातून पळून गेलो आणि अमृताशी वयाच्या २० व्या वर्षीच लग्न केले, तेव्हा मी माझ्या करियरबद्दल, चित्रपटांबद्दल बिलकुल सिरियस नव्हतो. मात्र, अमृता आली आणि तिने मला याबाबतीत गांभीर्याने विचार करायला भाग पाडले.”
तो पुढे म्हणाला, “आज मी जे काही या सिनेसृष्टीत चांगले वाईट काम केले आहे, त्यात अमृताचा खूप मोठा वाटा आहे. तिनेच मला या क्षेत्राबद्दल आणि यातील बेभरवशाच्या कारभाराबद्दल माहिती दिली. शिवाय तिने मला हे देखील सांगितले होते की, हसून आरामात काम करणे या इंडस्ट्रीत चालत नाही, त्यासाठी भरपूर कष्ट आणि एकनिष्ठता खूप महत्त्वाची आहे. शिवाय मी जेव्हा ‘दिल चाहता हैं’ सिनेमाच्या वेळी गोंधळात होतो, तेव्हा तिनेच मला हा रोल स्वीकारण्यासाठी आग्रह केला होता.”
सैफ आणि अमृताने १९९१ साली लग्न केले. या दोघांना सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत. मात्र दुर्दैवाने २००४ साली या दोघांचा घटस्फोट झाला. आता सारा आणि इब्राहिम अमृताकडे राहत आहे, तर सैफने २०१२ साली करीना कपूरसोबत लग्न केले असून, या दोघांना तैमूर नावाचा एक मुलगा आहे. ते तिघेही पतौडी पॅलेसमध्ये राहतात.
हेही वाचा-
काय होतोय सैफ चा मुलगा इब्राहिम अली खानचा हा फोटो व्हायरल?
‘भारतात जो पंतप्रधान तोच राजा’ तांडव वेबसिरीजचा जबरदस्त टिझर प्रदर्शित! पाहा सैफचा नवा अवतार