Tuesday, March 5, 2024

जेव्हा सेटवर स्टंट करताना सैफ अली खानला पडले १००पेक्षा अधिक टाके, प्रीती झिंटाने दिली होती साथ

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि प्रीती झिंटा (Preity Zinta) यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री आणि बॉंडिंग प्रेक्षकांना खूपच आवडली होती. त्या दोघांनी २००० साली आलेल्या ‘क्या केहना’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या एका प्रसंगामुळे सैफ आणि प्रीतीची मैत्री झाली होती. जी मैत्री त्यांनी आजपर्यंत जपली आहे.

‘क्या केहना’ या चित्रपटाच्या सेटवर झालेल्या एका घटनेचा खुलासा सैफ अली खानने त्याच्या एका मुलाखतीत केला होता. त्याने सांगितले होते की, “क्या केहना या चित्रपटात मला एक बाईकवर स्टंट करायचा होता. त्यामुळे मी दररोज स्टंट कोरिओग्राफरसोबत जुहू बीचवर सराव करत होतो. हा सीन शूट करण्यासाठी आम्ही खंडाळ्याला गेलो होते. तिथे पाऊस पडत असल्याने चिखल झाला होता. त्यावेळी तिथे प्रीति झिंटा देखील होती. खरंतर हा सीन एकाच शूटमध्ये ओके झाला होता. पण माझ्या सांगण्यावरून तो सीन परत शूट करत होते. परंतु तेव्हा तो स्टंट करताना माझी बाईक जोरात अडकली आणि हवेत उडत तसेच कुठेतरी लांब जाऊन पडली. तिथून एका दगडावर माझे डोके जोरदार आपटले होते.” (saif ali khan talk about his accident during kya kehna hai film)

सैफ अली खानने पुढे सांगितले की, “या अपघातानंतर मला लगेचच आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यावेळी माझ्या डोक्याला १०० टाके पडले होते. या कठीण परिस्थिती प्रीतीने माझी साथ सोडली नाही. तिनेच डॉक्टरसोबत सगळ्या गोष्टी बोलून ठेवल्या होत्या. आणि मला कशाप्रकारे योग्य उपचार मिळेल याची सोय केली होती.”

या प्रसंगानंतरच प्रीती आणि सैफ यांच्यातील मैत्री वाढली. ‘क्या केहना’ या चित्रपटानंतर सैफ आणि प्रीतीने ‘दिल चाहता है’, ‘कल हो ना हो’, ‘सलाम नमस्ते’ यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले.

हेही वाचा :

‘बिग बॉस १५’ ला मिळाली विजेती स्पर्धक, ट्रॉफीवर कोरले तेजस्वी प्रकाशचे नाव

शाहिद आणि मीराची जोडी पुन्हा एकदा आली चर्चेत, सोशल मीडियावर व्हायरल होतोय नवा फोटो

‘हे’ आहेत आलिया भट्टच्या करिअरला कलाटणी देणारे सुपरहिट चित्रपट, वाचा संपूर्ण यादी

हे देखील वाचा