Sunday, August 10, 2025
Home बॉलीवूड मुलांच्या नावावरून ट्रोल करणाऱ्या लोकांवर बोलताना सैफ म्हणाला, ‘माझी तेवढी लायकीच नाही की…’

मुलांच्या नावावरून ट्रोल करणाऱ्या लोकांवर बोलताना सैफ म्हणाला, ‘माझी तेवढी लायकीच नाही की…’

करीना कपूर आणि सैफ अली खान हे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध आणि फॅन्समध्ये लोकप्रिय असणारे कपल आहे. या दोघांचे लाखो फॅन्स आहेत. सैफ आणि करीनाबद्दल नेहमीच प्रेक्षकांना नेहमीच जाणून घ्यायला खूप आवडते. या दोघांवर आणि त्यांच्या मुलांवर मीडियाचे आणि फोटोग्राफर्सचे कॅमेरे सतत लक्ष ठेऊन असतात. त्यांच्या छोट्या हालचाली देखील मीडियामध्ये बातम्या बनून झळकतात. सध्या करीना आणि सैफ त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या नावावरून उठलेल्या वादंगामुळे चर्चेत आले आहे.

करीनाने याच वर्षाच्या सुरुवातीला एका मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर त्यादोघांवर शुभेच्छांचा पाऊस पडला. मात्र सर्वांना प्रश्न पडला होता की, ते त्यांच्या या मुलाचे काय नाव ठेवणार? अनेकांना वाटत होते की, पहिल्या मुलाच्या तैमूरच्या नावावरून झालेला वाद लक्षात घेऊन ते या मुलाचे नाव खूप विचार्पूर्व ठेवतील आणि त्यांनी तसे केले पण करीना आणि सैफने त्यांच्या या मुलाचे नाव ‘जेह’ उर्फ ‘जहांगीर’ असे ठेवले. पण या नावावरून देखील नवा वाद निर्माण झाला आहे.

जेह या नावावरून सैफ आणि करीनाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. वेगवेगळ्या कमेंट्स, मिम्स यातून त्यांना लक्ष केले जात आहे. आतापर्यंत अनेक कलाकार आणि सैफच्या बहिणीने पुढे येऊन ट्रोलर्सला फटकारले मात्र सैफ आणि करिनाकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नव्हते. मात्र आता सैफने यासर्व प्रकारावर त्याचे मत मांडले आहे. एका मोठ्या वृत्तपत्राशी बोलताना सैफने त्याचे मत मांडले आहे.

यावेळी सैफ म्हणाला, “हे संपूर्ण जग एकसारखे आनंदी नाही राहू शकत. आपण विशेष अधिकार प्राप्त लोकं असून, मला वाटते आपण सर्व चांगलेच आहोत. आपण आपला टॅक्स भरतो. कायद्याचे पालन करतो. लोकांचे मनोरंजन करण्यासाठी खूप मेहनत घेतो. जगात सकारात्मकता पसरवण्यासाठी मदत करतो. आणि मी अशा लोकांवर बोलावे जे नकारत्मकता आणि लोकांमध्ये दुरावा निर्माण करत आहे या लायकीचा मी नाही. मी या गोष्टींकडे लक्ष न देता दुसरीकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत असतो.”

करिनाने फेब्रुवारी २०२१ मध्ये जहांगीरला जन्म दिला होता. त्याला ते प्रेमाने जेह म्हणतात. करिनाने जेहच्या जन्मानंतर प्रेग्नन्सीवर आधारित एक पुस्तक देखील प्रकशित केले आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-श्वास रोखून धरा! रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर; ‘या’ दिवशी होणार रिलीझ

-क्रिकेटमधील ‘दादा’ गाजवणार सिनेमाचं मैदान; झालीय सौरव गांगुलीच्या बायोपिकची घोषणा

-‘घर की मुर्गी दाल बराबर!’ माधुरी दीक्षितने स्वतः लाच का दिली असेल ही उपमा?

हे देखील वाचा