Friday, October 17, 2025
Home मराठी ‘एकच नंबर दिसतेय!’ ‘आर्ची’च्या साडीतील अदांनी पुन्हा लावले चाहत्यांना वेड; पडतोय लाईक्स अन् कमेंट्सचा मोठ्ठा पाऊस

‘एकच नंबर दिसतेय!’ ‘आर्ची’च्या साडीतील अदांनी पुन्हा लावले चाहत्यांना वेड; पडतोय लाईक्स अन् कमेंट्सचा मोठ्ठा पाऊस

सोशल मीडियावर सतत सक्रिय राहणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे सर्वांची लाडकी ‘आर्ची.’ आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू हल्ली इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात वेळ घालवत असते. ती दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींपासून ते आगामी प्रोजेक्टबद्दल सर्वकाही चाहत्यांसोबत शेअर करत असते.

आता रिंकूचा एक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यात तिने साडी परिधान केलेली दिसत आहे. एवढेच नव्हे, तर साडी घालून ती केस बांधताना दिसत आहे. या फोटोत तिच्या मनमोहक अदा चाहत्यांना वेड लावायला पुरेशा आहेत. साडीमधील तिचा हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. चाहते या फोटोवर कमेंट करून, आपले प्रेम व्यक्त करत आहेत.

नेहमी प्रमाणे, तिच्या या फोटोवरही चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा मोठा पाऊस पडत आहे. कमेंट करत एका युजरने लिहिले, “एकच नंबर दिसतायेत.” दुसऱ्याने लिहिले, “झिंगाट!” याशिवाय अन्य युजर्सनेही कमेंट बॉक्समध्ये हार्टचे ईमोजी पोस्ट केले आहेत. रिंकूने साडीतील फोटो पोस्ट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिने बऱ्याचदा आपल्या पारंपरिक लूकने सर्वांना वेड लावले आहे.

नुकतीच रिंकू लारा दत्तासोबत ‘हंड्रेड’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. रुची नारायण दिग्दर्शित या सीरिजमध्ये तिने एका मराठी मुलीची भूमिका केली होती. यातील रिंकूच्या कामाचे खूप कौतुक झाले. तसेच सीरिजमधील रिंकूचा लूक प्रेक्षकांना खूप आवडला.

आता ती आगामी चित्रपट ‘झुंड’ मध्ये आकाश ठोसरसोबत दिसणार आहे. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चनही दिसणार आहेत. तसेच, चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे करत असून, हा चित्रपट यावर्षी 18 जून रोजी प्रदर्शित करण्यात येईल.

विशेष म्हणजे ‘सैराट’ चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणारी रिंकू दुसऱ्यांदा आकाश ठोसर आणि नागराज मंजुळे यांच्यासोबत झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मास्क न घालता रस्त्यावर ईद साजरी करत होती मुलगी, राखी सावंतने शिकवला चांगलाच धडा; पाहा व्हायरल व्हिडिओ

-अरे व्वा! अगस्त्यने टाकले पहिले पाऊल, हार्दिक आणि नताशाने केला व्हिडिओ शेअर

-‘ओव्हर ऍक्टिंगचे ५० रूपये कट करा’, लस टोचवताना मराठी अभिनेत्रीची नौटंकी पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल!

हे देखील वाचा