सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असल्याकारणने सिनेसृष्टीतील जवळजवळ सर्वच कलाकार सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वेळ घालवताना दिसत आहेत. सतत सक्रिय राहणाऱ्या कलाकारांपैकीच एक आहे, सर्वांची लाडकी ‘आर्ची’. आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू इंटरनेटवर वेळ घालवणे पसंत करते. ती दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींपासून ते आगामी प्रोजेक्टपर्यंत सर्वकाही चाहत्यांसोबत शेअर करत असते. आपले वेगवेगळे फोटो व व्हिडिओ शेअर करून रिंकू कायम चर्चा रंगवते.
अलीकडेच रिंकूने आपला एक ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ शेअर केला आहे, जो आता चाहत्यांना वेड लावत आहे. व्हिडिओमध्ये ‘हावडा ब्रिज’ चित्रपटातील ‘आईये मेहरबान’ गाण्यावर रिंकूच्या अदा अगदी पाहण्यासारख्या आहेत. यात आपण पाहू शकतो की, तिने डोक्यावर एक छत्री पकडली आहे. रिंकू हातात छत्री घेऊन गोल फिरत आहे आणि कॅमेऱ्याकडे पाहून हसत आहे. यातील तिचे गोड हास्य चाहत्यांना नव्याने तिच्या प्रेमात पाडत आहे.
काही वेळातच या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रिया देत नेटकरी रिंकूचे भरभरून कौतुक करत आहेत. ‘एकच नंबर’, ‘कडक’, ‘नाईस आर्ची ताई’, ‘लय भारी ना’ अशा कमेंट्स या व्हिडिओवर पाहायला मिळत आहे. याशिवाय बऱ्याच युजर्सने लाल हार्ट व फायर ईमोजी पोस्ट करून व्हिडिओचे कमेंट सेक्शन भरून टाकले आहे.
रिंकूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर काही दिवसांपूर्वीच तिने ‘छूमंतर’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा आगामी चित्रपट लंडनमध्ये शूट करण्यात आला आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरू सोबत, प्रार्थना बेहरे, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेनाही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. तसेच रिंकूचा ‘झुंड’ हिंदी चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ बच्चन अभिनित या चित्रपटात, तिच्यासोबत आकाश ठोसरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दगडाने संगीत वाजवत मुलाने ट्रेनमध्ये गायलं अरिजित सिंगचं गाणं; पाहा मन जिंकणारा व्हिडिओ