Friday, February 21, 2025
Home मराठी ‘सैराट’फेम रिंकू राजगुरुने शेअर केला पहिल्यांदा नाटक पाहण्याचा अनुभव; म्हणाली, ‘असं नाटक…’

‘सैराट’फेम रिंकू राजगुरुने शेअर केला पहिल्यांदा नाटक पाहण्याचा अनुभव; म्हणाली, ‘असं नाटक…’

2016 साली प्रदर्शित झालेला ‘सैराट’ चित्रपटातील आर्ची अर्थातच अभिनेत्री रिंकु राजगुरु ही मराठी मनोरंजन विश्वात प्रसिद्ध नाव आहे आहे. रिंकुचे आजवरचे सर्व सिनेमे चाहत्यांच्या पसंतील उतरले आहेत. वेबसीरिज असो वा चित्रपट रिंकुनं दमदारपणे आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना जिंकून घेतलं आहे. रिंकु सोशल मीडीयावर सक्रीय असते. रिंकु तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दलचे अपडेट्स तिच्या चाहत्यांना  देत असते. रिंकुने सोशल मिडीयावर एक पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये रिंकुने तिने आयुष्यात पाहिलेल्या पहिल्या नाटकाचा अनुभव सांगितला आहे.

रिंकु राजगुरुने (Rinku Rajguru)सोशल मिडीयावर एक नवीन पोस्ट शेअर केलीय. रिंकुने प्राजक्त देशमुख लिखित दिग्दर्शित संगीत देवबाभळी नाटक पाहिलं. रिंकुने हे नाटक पाहिल्यावर सोशल मिडीयावर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पोस्ट करुन रिंकु लिहीते..”माझ्या आयुष्यातील मी पाहिलेलं पहिलंच नाटक. अप्रतिम अनुभूती. सगळ्याच अंगाने सर्वांगसुंदर असं नाटक आहे ‘देवबाभळी’. प्राजक्त आणि  सगळ्या टीमला खूप शुभेच्छा आणि मनापासून अभिनंदन!”

प्रेक्षकांच्या लाडक्या आर्चीने ‘देवबाभळी’ हे नाटक पहिल्यांदा नाट्यगृहात पाहिल्याचे म्हटले आहे. ‘संगीत देवबाबळी’ या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन प्राजक्त देशमुख यांनी केले आहे. नाट्यरसिकांचे या नाटकाला भरभरून प्रेम मिळत आहे. रिंकूने शेअर केलेल्या फोटोंवर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया देत नाटकाचे कौतुक केले आहे.

रिंकु सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. रिंकुचा सोशल मीडियावर खुप मोठा चाहता वर्ग आहे. तिचे चाहते तिच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करत असातात. लवकरच अभिनेत्री रिंकू राजगुरू राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने यांच्या ‘खिल्लार’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये अभिनेता ललित प्रभाकर रिंकूसह प्रमुख भूमिका साकारणार आहे.(Sairat fame Rinku Rajguru shares the experience of watching the play for the first time)

हे देखील वाचा