नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाद्वारे रिंकू राजगुरूने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीचे यश मिळवले. या चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या चित्रपटात तिने ‘आर्ची’ची भूमिका साकारली होती. रिंकू या दिवसांत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे वेगवेगळे फोटो व व्हिडिओ शेअर करून, ती चाहत्यांना पुरते वेड लावून सोडते.
नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यात रिंकू अतिशय सुंदर दिसत आहे. हॉट अवतारात क्लिक केलेल्या या फोटोला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. आपण पाहू शकतो की, या फोटोमध्ये रिंकूने क्रॉप टॉप आणि निळी जीन्स परिधान केली आहे. केस मोकळे सोडून रिंकू यात ज्यापद्धतीने पोझ देत आहे, ही स्टाईल तिच्या चाहत्यांना वेड लावायला पुरेशी आहे.
चाहत्यांनी नेहमीप्रमाणेच रिंकूच्या या फोटोलाही पसंती दर्शवली आहे. कमेंट्सच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या कौतुकाचे पूल बांधणे चालूच आहे. याशिवाय फोटोवर लाईक्सचाही जोरादर पाऊस पडत आहे.
रिंकूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने काही दिवसांपूर्वीच ‘छूमंतर’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा आगामी चित्रपट लंडनमध्ये शूट करण्यात आला आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरूसोबत प्रार्थना बेहरे, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेनाही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. तसेच रिंकूचा ‘झुंड’ हिंदी चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ बच्चन अभिनित या चित्रपटात, तिच्यासोबत आकाश ठोसरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…