Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘रंग माझा वेगळा’ मालिकेला बालकलाकार साईशा भोईरने ठोकला रामराम, आई वडिलांनी सांगितले ‘हे’ महत्वाचे कारण

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. मालिकेची कथा आणि कलाकारांच्या अभिनयाला घराघरात मिळणाऱ्या जोरदार प्रतिसादामुळे ही मालिका सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. मालिकेतील दिपा आणि कार्तिकची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या मालिकेतील दिपा आणि कार्तिकीच्या भूमिकेतील दोन चिमुरड्यांच्या गोड अभिनयाने सर्वांचीच मने जिंकली आहेत. यामध्ये दिपाची भूमिका स्पृहा दळीने तर कार्तिकची भूमिका साईशा भोईरने (Saisha Bhoir)  साकारली आहे. परंतु आता या बालकलाकार साईशा भोईरने ही मालिका सोडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. 

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील गोड बालकलाकार साईशा भोईरने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. या मालिकेतील तिने साकारलेल्या दिपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची जोरदार पसंती पाहायला मिळत होती. तिच्या बाललिला आणि गोड अभिनयाचे व्हि़डिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. आता या मालिकेतून दिपा म्हणजेच साईशा भोईरने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. साईशाला मोठा प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याने तिने ही मालिका सोडल्याचे सांगितले आहे.

साईशा भोईरच्या आई वडिलांनी इंस्टाग्राम लाईव्ह करत याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली. ज्यामध्ये त्यांनी यापुढे मालिकेत साईशा दिसणार नसली तरी ती सोशल मीडियावर मात्र नेहमीच सक्रिय असणार असल्याचे सांगत तिच्या हितासाठीच हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. याबद्दल पुढे बोलताना साईशाच्या आई वडिलांनी ती लवकरच एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये झळकणार असून आम्ही त्याबद्दलची माहिती सोशल मीडियावरुन देऊ असे सांगितले आहे. दरम्यान साईशा भोईर ही लोकप्रिय रिलस्टार असून ती नेहमीच तिचे नवनवीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ज्याला तिच्या चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत असतो.

हे देखील वाचा