Wednesday, December 3, 2025
Home बॉलीवूड ‘सैयारा’ नं जिंकलं आलियाचं मन! – आलियाची भावनिक पाेस्ट

‘सैयारा’ नं जिंकलं आलियाचं मन! – आलियाची भावनिक पाेस्ट

अहान पांडे (Ahaan Panday) आणि अनीत पड्डा (Aneet Padda) यांच्या ‘सैयारा’ (Saiyaara) या चित्रपटाचं तुफान कौतुक होतंय. इतकं की, आलिया भट्टलाही थांबता आलं नाही. तिनं एक छानसं आणि मोठं पोस्ट टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या.

अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या ‘सैयारा’ या चित्रपटाने फक्त दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर धम्माल केली आहे,आणि प्रेक्षकांच्या मनातही तो बसला आहे. दोघंही कलाकार खूपच चर्चेत आहेत आणि त्यांचं कौतुक होतंय. ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटातील अभिनेत्री आलिया भट्टने आधीच या दोघांबद्दल आणि चित्रपटाबद्दल पोस्ट केली होती. आता तिनं हा चित्रपट पाहिलासुद्धा! आलिया भट्टने तिच्या पोस्टमध्ये फक्त या दोघा अभिनेत्यांचंच नाही, तर दिग्दर्शक मोहित सूरीचंसुद्धा भरभरून कौतुक केलं आणि त्याला शुभेच्छाही दिल्या.

आलियाने अहान आणि अनीतला टॅग करत असं लिहिलं,”खरंच सांगायचं तर दोन जादूई तारे जन्मलेत असंच वाटतंय”. पुढे ती म्हणाली,”मला आठवतही नाही, शेवटचं कधी अशा दोन कलाकारांना इतकं मनापासून पाहिलं होतं. तुमच्या दोघांच्या डोळ्यांत खूप चमक होती. तुम्ही दोघंही इतकं सुंदर आणि प्रामाणिकपणे काम केलं आहे की मी तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहू शकते आणि खरं सांगायचं तर बघणारच आहे!” आलिया इतकी खुश झाली होती की तिला वाटलं, एकदाचं लिहिलं तरी पुरेसं नाही! म्हणून तिनं पुन्हा एकदा आपल्या भावना शेअर केल्या. आणि त्यानंतर तिनं दिग्दर्शक मोहित सूरीचंही भरभरून कौतुक केलं.

आलियाने मोहित सूरीचं कौतुक करत लिहिलं,”तुम्ही या चित्रपटाचे खरे कॅप्टन आहात! काय भन्नाट सिनेमा आहे भावना, संगीत, सगळंच अफलातून! तुम्ही मला अशा भावना दिल्या ज्या फक्त चांगल्या सिनेमातूनच मिळतात. ‘सैयारा’ मध्ये खूप आत्मा आहे,खूप भाव आहे आणि यात असं काहीतरी खास आहे जे मनात खोलवर घर करतं तेही अगदी सुंदर पद्धतीनं”.

यानंतर तिनं संपूर्ण टीमचं अभिनंदन करत लिहिलं की,”मला हे सगळं अनुभवायला मिळालं याचा खूप आनंद आहे”. अर्जुन कपूरनंही ‘सैयारा’ पाहिल्यावर लगेच प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला,”काय जबरदस्त चित्रपट आहे!” आणि त्यानं अहान, अनीत आणि मोहित सूरी या तिघांचंही खास करून कौतुक केलं. हा चित्रपट मोहित सूरी यांनी दिग्दर्शित केला आहे आणि तो फक्त 60 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला. पण तरीही आत्तापर्यंत त्यानं 42 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे! खरं तर, हा चित्रपट सगळ्यांसाठी एक मोठा सरप्राइज ठरलाय.

या चित्रपटात अहान पांडे आणि अनीत पड्डा हे दोघंही अगदी नवे चेहरे आहेत. पण त्यांचं कौतुक फक्त आलिया भट्टनं केलं असं नाही, तर सिनेमागृहामधून बाहेर पडणारे प्रेक्षकसुद्धा म्हणतायत,“वा! काय काम केलंय दोघांनी!”

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

जेव्हा नवाझने मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीला पडद्यावर कीस केलं; देशभरातून झाली होती सडकून टीका…

हे देखील वाचा