साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक दिग्गज चित्रपटांची निर्मिती केली आहे. सलमान शाहरुख सारख्या दिग्गज अभिनेत्यांना त्यांनी आपल्या चित्रपटात भूमिका देऊन प्रसिद्ध केले आहे. आता ते लवकरच कॉमेडीयन कपिल शर्माला (Kapil Sharma) घेऊन चित्रपट तयार करणार आहे ज्याची माहिती त्यांनी कपिल शर्माच्याच कार्यक्रमात दिली आहे.
दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला आपल्या शानदार चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. ते या आठवड्यात कपिल शर्माच्या शोमध्ये त्यांची पत्नी वर्धा खानसोबत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत या शोमध्ये अभिनेता टायगर श्रॉफ, क्रिती सेनन आणि अहान शेट्टी असे अनेक दिग्गज कलाकार आले होते. हा भाग साजिद नाडियाडवाला ग्रँडसन इंटरटेनमेंटला यशस्वी ६७ वर्ष पूर्ण केल्याबद्दल आणि त्यांचा प्रवास दाखवण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
कार्यक्रमात कपिल शर्मा नेहमीप्रमाणे आपल्या खास शैलीत धमाल करताना दिसून आला. त्याने साजिद नाडियाडवाला यांना त्याने विचारले की, “या कार्यक्रमात येऊन कसे वाटत आहे?” कपिल शर्माच्या या बोलण्यावर बोलताना साजिद नाडियाडवाला यांनी सांगितले की, “हा कार्यक्रम नेहमीच मी माझा असल्याचे समजत असतो. कारण मीच चित्रपट क्षेत्रात अर्चना सिंगची ओळख करून दिला होता. मुझसे शादी करोगी मध्ये नवज्योत सिंग सिद्धूला निवेदक म्हणून काम दिले. त्यानंतर सुमोना चक्रवर्ती, आणि आता कृष्णा अभिषेकला सुद्धा मीच आणले.”
साजिद नाडियाडवाला पुढे म्हणाले की, “मी आता त्या अभिनेत्याचा दिग्दर्शक आहे जो या कार्यक्रमाचा दिग्दर्शक आहे.” याच कार्यक्रमात त्यांनी कपिल शर्माला घेऊन नवीन चित्रपट तयार करणार असल्याची घोषणा केली. त्यांनी या चित्रपटाची कथा तयार असल्याचे सुद्धा सांगितले. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “कपिल शर्मासाठी एक स्क्रिप्ट तयार असून पुढच्या महिन्यात त्या चित्रपटाची मी अधिकृत घोषणा करणार आहे.” दरम्यान आगामी काळात साजिद नाडियाडवाला यांनी दिग्दर्शन केलेले अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ज्यामध्ये ‘बच्चन पांडे, हिरोपंती २, या दिग्गज चित्रपटांचा समावेश आहे.