Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड ‘अगं बाई पॅंट तरी घाल!’, साक्षी मलिकच्या बोल्ड फोटोंवर उमटल्या नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

‘अगं बाई पॅंट तरी घाल!’, साक्षी मलिकच्या बोल्ड फोटोंवर उमटल्या नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

आपल्या चष्मावाल्या लूकने सर्वांची वाहवा मिळवणारी साक्षी मलिक (Sakshi Malik) आजकाल तिच्या हॉट लूकने चाहत्यांची मने जिंकत आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. अशातच पुन्हा एकदा तिने आपल्या लूकने चाहत्यांना वेड लावले आहे. अभिनेत्रीने असे फोटो शेअर केले आहे की, ते बघता बघताच व्हायरल झाले आहेत.

व्हायरल झाला साक्षीचा बोल्ड लूक
बॉलिवूड इंडस्ट्रीतील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक साक्षी मलिक हिची फॅन फॉलोविंग प्रचंड आहे. तिचा अभिनय आणि तिची स्टाईल नेहमीच चाहत्यांना वेड लावत असते. तिच्या पोस्टवर चाहते प्रेम व्यक्त करताना दिसतात. नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे. साक्षी मलिक कधी तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते, तर कधी तिच्या चित्रपटांमुळे. यावेळी तिच्या चर्चेत असण्यामागचे कारण तिचे फोटो आहेत. या फोटोंमुळे साक्षी मलिक सोशल मीडियावर तापमान वाढवत आहे. या व्हायरल फोटोंमध्ये अभिनेत्री बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडताना दिसत आहे. (sakshi malik clicked photos without pants people trolled her brutally)

घातली नाही पॅंट!
साक्षी मलिक या फोटोंमध्ये विना पँटची दिसत आहे. होय! या फोटोंमध्ये अभिनेत्रीने पँट घातलेली नाही. साक्षीने फोटोमध्ये फक्त टॉप घातलेला दिसत आहे. तिच्या नुकत्याच झालेल्या फोटोशूटमधून हे फोटो समोर आले आहेत, ज्याला व्हायरल व्हायला सध्या खूप हवा मिळत आहेत. अभिनेत्रीच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. सोशल मीडिया युजर्स कमेंट करून तिला बरे-वाईट ऐकवत आहेत. यासोबतच तिचे काही चाहते तिला सपोर्ट करतानाही दिसत आहेत.

साक्षीचे चित्रपट
दुसरीकडे, अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर साक्षी मलिक सध्या कोणत्याही चित्रपटात दिसणार नाही. २०१८ साली ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाद्वारे साक्षीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन, नुसरत भरुचा, सनी सिंग, आलोक नाथ, वीरेंद्र सक्सेना असे अनेक मोठे कलाकार दिसले होते. यासोबतच ती शेवटची २०२० मध्ये आलेल्या ‘व्ही’ चित्रपटात दिसली होती. तिचा हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट होता. यातील तिचा अभिनय चाहत्यांना खूप पसंत पडला. तिला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा