Friday, July 5, 2024

अरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटावर बोलताना सलीम खान म्हणाले, ‘मी माझ्या मुलांच्या…’

बॉलिवूडमध्ये रिलेशन, लग्न, ब्रेकअप आणि घटस्फोट या गोष्टी खूपच सामान्य असतात. रोज या आभासी जगात नवीन नाते तयार होते, तर जुने तुटते. आपल्या सारख्या सामान्य लोकांना या गोष्टी खूपच त्रासदायक किंवा आश्चर्यकारक वाटत असल्या तरी कलाकारांसाठी नॉर्मल आहेत. अनेक वर्षांचे लग्न मोडणे ही खूप मोठी बाब आहे. आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक घटस्फोट झाले, मात्र त्यात मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला. १८ वर्षांचा मोठा संसार त्यांनी मोडल्याने सर्वांचेच डोळे मोठे झाले.

एका मुलाखतीमध्ये मलायकाने सांगितले होते की, तिच्या घटस्फोटाच्या आदल्या दिवशी रात्री देखील तिच्या आईवडिलांनी तिला पुन्हा विचार करण्याचा सल्ला दिला होता. मलायका आणि अरबाजच्या घटस्फोटावर अरबाजचे वकील आणि जेष्ठ लेखक सलीम खान यांना देखील प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी यावर उत्तर देताना सांगितले की, “मी एक लेखक आहे, मला कोणाच्याही प्रेम संबंधांबद्दल आणि वेगळे होण्यावर प्रश्न विचारू नका. मी माझ्या मुलांच्या वैयक्तिक आयुष्यात अजिबात दखल देत नाही.”

पुढे सलीम खान म्हणाले होते की, “मी या प्रकरणावर अजिबात बोली इच्छित नाही.” यासोबतच मलायकाची आई जोएसे पोलीकार्प यांनी देखील या घटस्फोटावर बोलण्यात स्वारस्य दाखवले नाही. जेव्हा त्यांना याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की, “ते समजदार आहेत. त्यांना सर्व योग्य पद्धतीने माहित आहे. मी यात पडू इच्छित नाही आणि मीडियामध्ये देखील याबद्दल बोलू इच्छित नाही.”

अरबाज आणि मलायकाने त्यांचा १८ वर्षांचा संसार मोडत काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला. या दोघांना अरहान खान नावाचा एक मुलगा असून, सध्या तो परदेशात त्याचे शिक्षण पूर्ण करत आहे. मलायका अर्जुन कपरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे तर अरबाज इंटरनॅशनल मॉडेल असलेल्या जॉर्जियाला डेट करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-युविका चौधरीच्या अगोदर ‘या’ सुंदऱ्यांसोबत जोडलं गेलंय प्रिन्सचं नाव, नोरा फतेहीचाही आहे समावेश

-भररस्त्यात पती रोहनप्रीतसोबत रोमान्स करताना दिसली नेहा कक्कर, गायिकेचे ‘लिप-लॉक’ फोटो आले समोर

-‘या’ अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोरच उघडली शर्टची बटणं आणि पँटची झिप, व्हायरल होतंय बोल्ड फोटोशूट

हे देखील वाचा