Thursday, February 20, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूडची सर्वात यशस्वी स्क्रिप्ट रायटरची जोडी ‘सलीम – जावेद’ तुटली तरी कशी, जाणून घ्या

बॉलिवूडची सर्वात यशस्वी स्क्रिप्ट रायटरची जोडी ‘सलीम – जावेद’ तुटली तरी कशी, जाणून घ्या

कलाकारांना आपण नेहमी अभिनय करताना पडद्यावर बघतो. मात्र कलाकार अभिनय करतात त्यामागे अनेक मोठमोठ्या लोकांची मेहनत असते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात पडद्यामागे काम करणारे कलाकार देखील लाइमलाईट्मधे येत असतात. मात्र पूर्वीच्या काळात असे नव्हते. पडद्यामागे राहून कोणतेही लाईमलाइट न मिळवता आपले काम उत्तम पद्धतीने करत जगासमोर आणणारे अनेक कलाकार होते, आहेत. कोणत्याही चित्रपटाला सुरुवात करण्यापूर्वी त्याला आवश्यता असते ती एका स्क्रिप्टची. जर चित्रपटाची स्क्रिप्ट दमदार असेल तर त्या चित्रपटाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आजच्या घडीला इंडस्ट्रीमध्ये अनेक उत्तम स्क्रिप्ट रायटर आहेत. मात्र ७०/८० च्या दशकात संपूर्ण बॉलिवूडमध्ये स्क्रिप्ट रायटर म्हटले की, एक आणि एकच नाव गुंजत होते आणि ते म्हणजे सलीम-जावेद.

सलीम-जावेदची जोडी म्हटले की, चित्रपट यशस्वी होणारच हे समीकरण जुळले. अमिताभ बच्चन यांना ‘अँग्री यंग मॅन’ हा किताब मिळवून देण्यात या जोडीचा मोठा वाटा आहे. आज याच जोडीतले सलीम खान आज त्यांचा ८६ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती.

सलीम खान यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९३५ रोजी इंदोर इथे झाला. त्यांनी १९६४ साली महाराष्ट्रीयन असलेल्या सुशीला चरक यांच्याशी त्यांनी लग्न केले. पुढे सुशीला यांचे नाव बदलून सलमा खान ठेवण्यात आले. त्यांना सलमान, अरबाज, सोहेल आणि अलवीरा ही मुलं झाली. सलीम खान यांनी एक अभिनेता म्हणून त्यांच्या करिअरला सुरूवात केली. त्यांनी तीसरी मंजिल, सरहदी लुटेरा, दीवाना, वफादार आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. जवळपास २५ चित्रपटांमध्ये अतिशय छोटे, सहायक रोल केल्यानंतर त्यांना जाणवले की, ते अभिनेता होऊ शकत नाही.

त्यानंतर त्यांनी त्यांचे संपूर्ण लक्ष लिखाणावर केंद्रित केले आणि त्यातूनच ते एक स्क्रिप्ट रायटर म्हणून समोर आले. पुढे त्यांची आणि गीतकार जावेद अख्तर यांची जोडी जमली. या दोघांनी मिळून अनेक चित्रपटाचे लेखन केले आणि ते सर्व सिनेमे सुपरहिट झाले. या जोडीचे यश पाहून प्रत्येकालाच यांच्या सिनेमात काम करायचे होते. या दोघांनी जंजीर, दीवार, शोले, सीता और गीता, डॉन, हाथी मेरे साथी, यादों की बरात, त्रिशूल, दोस्ताना, क्रांती, मि. इंडिया, काला पत्थर, ईमान धरम, शान आदी चित्रपटांचे लिखाण केले.

मात्र पुढे त्यांची जोडी तुटली. याबद्दल बोलताना बोलताना सलीम जावेद म्हणाले होते की, “प्रत्येक बॉक्सची एक एक्सपायरी डेट असते, तर या नात्याची देखील असायला पाहिजे. आम्ही जावेद अख्तर यांच्या घरी बसलो होतो. तेव्हा ते म्हणाले की, त्यांना वेगळे व्हायचे आहे. वेगळे होऊन काम करायचे आहे. मी तिथून उठलो त्यांच्याशी हात मिळवला आणि निघालो. माझ्या गाडीकडे जात असताना मी देखील माझ्यासोबत चालायला सुरूवात केली, तेव्हा मी थांबलो आणि त्यांना त्यांच्या घरी जाण्यास सांगितले. मी त्यांना सांगितले की, मी माझी काळजी घेईल. दुसऱ्या दिवशी मला फोन येण्यास सुरुवात झाली आणि आम्ही वेगळे झाल्याबद्दल विचारणा केली जाऊ लागली. तेव्हा मी जावेद यांना विचारले तुम्ही कोणाला आपण वेगळे झालो याबद्दल सांगितले का? त्यावर ते म्हणाले, हो दोन, तीन मित्रांना माहित आहे. त्यानंतर मी स्वतः आम्ही वेगळे झालो असल्याचे जाहीर केले.

 

सलीम खान यांनी त्यांच्या आयुष्यात दोन लग्न केली एक सलमा खान यांच्याशी तर दुसरे अभिनेत्री हेलन यांच्याशी. हेलन यांच्याशी लग्न झाल्यानंतर सलमान खान खूपच नाराज झाला होता. कारण सलमानचे त्याच्या आईवर सलमा यांच्यावर खूप प्रेम होते. तो अगदी ममाज बॉय होता. त्याला त्याच्या आईची जागा कोणालाही दयायची नव्हती, आणि आईला त्रास झालेला देखील बघायचा नव्हता. मात्र त्याच्या वडीलानी त्याला समजवल्यानंतर त्याने त्याची नाराजी सोडून दिली. सलीम खान आणि हेलन यांनी अर्पिताला दत्तक घेतले. सलीम खान यांचे खूपच मोठे कुटुंब असून यात सर्वच धर्मांचे लोकं आपल्याला दिसतात.

सलीम खान यांनी त्यांच्या मुलांना नेहमीच उत्तम शिकवण दिली. त्यांची हीच शिकवण नेहमीच त्यांच्या मुलांमध्ये दिसून येते. आजही सलमान खान नेहमी त्याच्या चित्रपटांबद्दल किंवा इतर कोणत्याही बाबतीतील अनेक सल्ले सलीम खान यांच्याशी बोलून घेतो. सलीम खान आज जरी इंडस्ट्रीमध्ये काम करत नसले तरी ते अनेकदा विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-युविका चौधरीच्या अगोदर ‘या’ सुंदऱ्यांसोबत जोडलं गेलंय प्रिन्सचं नाव, नोरा फतेहीचाही आहे समावेश

-भररस्त्यात पती रोहनप्रीतसोबत रोमान्स करताना दिसली नेहा कक्कर, गायिकेचे ‘लिप-लॉक’ फोटो आले समोर

-‘या’ अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोरच उघडली शर्टची बटणं आणि पँटची झिप, व्हायरल होतंय बोल्ड फोटोशूट

हे देखील वाचा