Sunday, April 14, 2024

अरबाज आणि मलायकाच्या घटस्पोटावर अशी होती सलीम खान यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मी माझ्या…’

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांची आज सर्वत्र चर्चा आहे. काही कापलं एकमेकांपासून दूर झाले आहेत, तरी देखील आजही त्यांची नावे एकमेकांशी जोडलेली आहेत. यातच अरबाज खान (Arbaaz Khan) आणि मलायका अरोरा (malika arora) यांच्या नात्याची खूप चर्चा आहे. ते आज एकमेकांपासून दूर आहेत, तरी देखील त्यांची चर्चा नेहमीच होत असते. माध्यमातील वृत्तानुसार, मलायका आणि अरबाज यांची पहिली भेट एका फोटोशूटदरम्यान झाली होती. इथे एकमेकांना पाहून ते प्रेमात पडले. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर अरबाज आणि मलायका यांनी १९९८ मध्ये लग्न केल्याचे सांगितले जाते. या लग्नातून त्यांचा मुलगा अरहान खानचा जन्म झाला. मात्र, लग्नाच्या १९ वर्षानंतर मलायका आणि अरबाजने २०१७ मध्ये एकमेकांपासून घटस्फोट घेतला आणि सर्वांनाच धक्का दिला.

एकदा अरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटावर सलीम खानची (salim khan) प्रतिक्रिया मीडियालाही जाणून घ्यायची होती. याविषयी बोलताना सलीम खान यांनी “मी एक लेखक आहे, माझ्याशी कोणाच्याही अफेअर आणि ब्रेकअपबद्दल बोलू नका, मी माझ्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाही आणि त्याबद्दल बोलूही शकत नाही,” असं म्हटलं होतं.

मलायका आणि अरबाज दोघेही आपापल्या आयुष्यात आनंदी आहेत. मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबत गंभीर नात्यात आहे, तर अरबाज खान देखील इटालियन मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे.

मलायका-अर्जुन असो किंवा अरबाज-जॉर्जिया, ते अनेकदा एकत्र दिसतात. मात्र, आत्तापर्यंत मलायका किंवा अरबाज दोघांनीही ते कधी लग्न करणार आहेत याचा खुलासा केलेला नाही. मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर (Arjun Kapoor) नुकताच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

नकारात्मक पात्रांनी दिली खरी ओळख, वैयक्तिक आयुष्यामुळे काम्या पंजाबी नेहमीच बनली चर्चेचा विषय

काय सांगता! ‘जुदाई’ चित्रपटावेळी श्रीदेवी होत्या प्रेग्नेंट, सहअभिनेत्रीनेच केला खुलासा

सनी देओल सोडाच, रजनीकांत यांच्यावरही भारी पडली होती श्रीदेवी; तिनंच ठरवलेलं सिनेमात कुणाला करायचं कास्ट

हे देखील वाचा