Saturday, June 29, 2024

सलीम खान यांनी सांगितले अरबाज आणि सोहेल यांना बॉलिवूडमध्ये मिळालेल्या अपयशाचे करण

सलमान खान बॉलिवूडमधील सर्वात मोठे नाव. सलमान खानला जी फॅन फॉलोविंग लाभली ती कदाचित इतर कोणत्याही कलाकाराच्या नशिबात नसेल. त्याची सुपर क्रेझ प्रेक्षकांमध्ये दिसून येते. सलमान खानला लाभलेले स्टारडम सर्वांच्याच नशिबात नसते. सलमानच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्य देखील सर्वश्रुत आहे. सलमान खानचे पूर्ण कुटुंब कोणत्या ना कोणत्या पद्धतीने चित्रपटांशी जोडले गेले आहे. सलमान खानचे वडील सलीम खान हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक आहे. मात्र त्यानी नेहेमीच स्वतःला लाइमलाईटपासून लांब ठेवले. नुकतीच त्यांनी त्यांच्या मुलाच्या अरबाज खानच्या शोमध्ये हजेरी लावली आणि अनेक प्रश्नांना उत्तरं दिली.

अरबाज खान एक नवीन शो होस्ट करत आहे. ‘द इन्विंसिब्लेस’ असे त्याच्या नवीन शोचे नाव आहे. सध्या अरबाज खान होस्ट करत असलेले सर्व शो सुपरहिट होत आहे. नुकतेच त्याच्या या नवीन शोमध्ये त्याचे वडील आणि लेखक असलेल्या सलीम खान यांनी हजेरी लावली होती. या भागात दोन्ही वडील मुलाने तुफान मजा केली. यावेळी त्यांनी खूप मजा तर केली सोबत अनेक गोष्टींचा खुलासा देखील केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

या शोमध्ये अरबाज त्याचे वडील असणाऱ्या सलीम खान यांच्या लग्नापासून ते त्यांच्या संघर्षापर्यंत, मुलांपर्यंत अनेक विषयांवर दिलखुलास चर्चा केली. या गप्पांदरम्यान अरबाज खानने सलीम खान यांना विचारले, “सलमान खान जगात खूप मोठा स्टार आहे. त्याने त्याच्या यशात खूप काही कमावले आहे. त्याच्या तुलनेत तुमचे दोन्ही मुलं जास्त यशस्वी होऊ शकले नाही?” यावर उत्तरं देताना सलीम खान म्हणाले, “जेव्हा मी त्याची मेहनत बघतो, तेव्हा मला वाटते की तो पूर्ण प्रयत्न करतो. मी देखील खूपच आशावादी आहे. मुख्य बाब म्हणजे तो कधीच त्याचा वेळ वाया जाऊ देत नाही. सतत काही ना काही करत वेळेचा उपयोग करत असतो.”

यातच अरबाजने त्यांना विचारले, “अपयश कसे हाताळायचे?” यावर सलीम खान उत्तर देताना म्हणाले, “अपयश हाताळणे खूपच सोपे आहे. फक्त तुम्हाला आहेच विचार करायचा असतो की, यातून बाहेर कसे पडायचे. यश हे लोकांच्या डोक्यावर बसते. एका लोकप्रिय दिग्दर्शकाने म्हटले आहे की, “अपयशापेक्षा अधिक यश लोकांचा घात करते.”

तत्पूर्वी सलीम खान यांचे तीन मुलं सलमान, अरबाज आणि सोहेल खान हे बॉलिवूडमध्ये सक्रिय असून, सोहेल खान आणि अरबाज निर्मिती आणि दिग्दर्शक म्हणून काम करत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नावर कंगना रनौतची प्रतिक्रिया; म्हणाली, ‘इंडस्ट्रीमध्ये कदाचितच खरं प्रेम…
सिद्धार्थ मल्होत्राला बळजबरी कियारा अडवाणीला करावा लागलं होतं किस, वाचा तो रंजक किस्सा

हे देखील वाचा