बॉलिवूडमधील ‘करण-अर्जुन’ म्हणजेच शाहरुख खान आणि सलमान खान हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. एकमेकांच्या चांगल्या वाईट प्रसंगात ते नेहमीच उभे राहिले आहेत. मग ती व्यावसायिक गोष्ट असो किंवा वैयक्तिक असो. दोघांच्या मैत्रीची कहाणी सगळ्यांना माहित आहे. आर्यन खान अं’मली पदार्थ प्रकरणात सलमान खान हा शाहरुख खानसोबत उभा होता. आर्यन खानच्या सुटकेनंतर शाहरुखला भेटणाऱ्या पहिल्या माणसांपैकी सलमान खान हा एक होता. आता पुन्हा एकदा त्याने असे एक काम केले आहे, ज्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
सलमान खानने आर्यनच्या जामीनानंतर शाहरुख खानसाठी त्याच्या शूटिंग वेळेमध्ये अनेक बदल केले आहेत. जेणेकरून शाहरुख खानला जरा वेळ मिळेल आणि तो त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकतो. सलमान खानचा ‘टायगर ३’ आणि शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट एकमेकांशी सबंधित आहे. (Salman Khan adjest tiger 3 schedule for shahrukh khan and katrina kaif)
व्हायआरएफद्वारा निर्मित दोन्ही सुपरस्टारने एकमेकांच्या चित्रपटांमध्ये कॅमियो केला आहे. तसेच आर्यन खानच्या अटकेनंतर ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगला उशीर झाला. ज्याचा परिणाम ‘टायगर ३’ च्या शूटिंगवर झाला. अशातच आपल्या मित्रांची साथ देताना सलमानने ‘टायगर ३’च्या शूटिंगची तारीख बदलली आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, शाहरुख आणि सलमान यांना क्रॉस ओव्हर स्पाई युनिवर्स वेंचरमध्ये ‘पठाण’ आणि ‘टायगर ३’ च्या रुपात त्यांच्या वाट्याची शूटिंग करायची होती. परंतु शाहरुख खानला त्याच्या मुलासोबत काही वेळ घालवायचा आहे, त्यामुळे त्याने या महिन्यात ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. आपल्या मित्रासाठी सलमान खानने त्याच्या शूटिंगच्या तारखा ऍडजेस्ट केल्या.
‘टायगर ३’ चित्रपटाची शूटिंग डिसेंबरमध्ये सुरू होणार होती. परंतु आता त्या महिन्यात कॅटरिना कैफ विकी कौशलसोबत लग्न करणार आहे, अशा चर्चा चालू आहेत. त्यामुळे सलमानने ही शूटिंग जानेवारी महिन्यात ढकलली आहे. नोव्हेंबर महिन्यात सलमान खान त्याच्या ‘अंतिम’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट २६ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट मराठीमधील ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचा रिमेक आहे. यात सलमान खानसोबत आयुष शर्मा दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-