Monday, July 1, 2024

‘दारू माणसाला रस्त्यावर आणते’ हे महेश भट्ट यांनी स्वतः अनुभवले, नशेत रात्र काढली होती फुटपाथवर

सध्या अरबाज खानचा शो ‘द इन्विंसिबल’ खूपच गाजत आहे. शोमध्ये विविध कलाकार येऊन त्यांच्या करियरबद्दल त्यांच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टींचा प्रेक्षकांसमोर खुलासा करतात. नुकतीच या शोमध्ये दिग्दर्शक महेश भट्ट यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांबद्दल सर्वाना सांगितले. यावेळी त्यांनी एक किस्सा सांगितलं. सलीम खान यांच्या घरी ते एवढी दारू प्यायले होते की त्यांना घरी सोडायला अरबाज आणि सलमान केले गेले होते. मात्र त्यातही एक गंमत झाली.

या शोमध्ये महेश भट्ट यांनी अरबाज खानसोबत बोलताना त्यांच्या दारूच्या व्यसनाबद्दल देखील सांगितले. ते म्हणाले एकदा त्यांनी एवढी दारू घेतली की ते रोडवरच झोपून गेले. मात्र त्यांच्या दुसऱ्या मुलीच्या शाहीनच्या जन्मानंतर अनेक गोष्टी बदलल्या. यासोबतच त्यांनी त्यांच्या दारू पिण्याचा एका किस्सा देखील यावेळी सर्वाना सांगितला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

अरबाज शोमध्ये म्हणतो, “तुम्ही एकदा खूप नशेत होता, मात्र वडिलांची इच्छा होती की तुम्ही घरी जावे. मी आणि सलमानने तुम्हाला टॅक्सीपर्यंत सोडायला येण्याचा विचार केला. मात्र तुम्ही विसरला होता की तुम्ही कुठे राहता. हे आमच्यासाठी खूपच लाजिरवाणे होते. मात्र आम्ही दोघं खूपच हसत होतो. तेव्हापासून आजपर्यंत तुमच्यात खूपच बदल झाला आहे. यावर ते म्हणतात, “एकदा मी खूप प्यायलो. आणि मला नंतर जाणवले की मी जेवीपीडी स्कीमच्या फुटपाथवर झोपलो होतो. मला आठवते की माझा चेहरा रोडकडे होता आणि सकाळ होणार होती. मला आठवते की मी पार्टीमधून येत होतो. पुढे मी घरी गेलो आणि सोनीने विचारले काय झाले. मी म्हणालो माहित नाही मला वाटते मला दारूचे व्यसन लागले.”

पुढे महेश भट्ट म्हणाले, “त्यानंतर जादू झाली आणि सोनी आणि माझ्या मुलीचा शाहीनचा जन्म झाला. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा मी तिला हातात घेतले आणि मला जाणवले की ती माझ्यापासून दूर जाते. तिला दारूचा वास सहन झाला नाही आणि त्यानंतर माझी दारू सुटली.” दरम्यान महेश भट्ट हे बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘माझी आई मारत होती, बाबा ओरडत होते…’, वर्ल्डकपमध्ये कपडे काढल्याच्या वक्तव्यावर पूनम पांडेने उघडले गुपित

अभिनेता आकाश कुंभारचे ‘गडद अंधार’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण

हे देखील वाचा