Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड Tiger 3 | लग्नानंतर पहिल्यांदाच सलमान खानसोबत दिसली कॅटरिना कैफ, दोघांच्या कूल स्टाईलने वेधले लक्ष

Tiger 3 | लग्नानंतर पहिल्यांदाच सलमान खानसोबत दिसली कॅटरिना कैफ, दोघांच्या कूल स्टाईलने वेधले लक्ष

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आणि कॅटरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या ‘टायगर ३’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. ‘भारत’ या चित्रपटानंतर सलमान आणि कॅटरिना ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर बघण्यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत. जेव्हापासून ‘टायगर ३’ या चित्रपटाची घोषणा झाली आहे आणि सेटवरील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे, तेव्हापासून हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची चाहते वाट पाहत आहेत. या चित्रपटाची शेवटची शूटिंग करण्यासाठी सलमान आणि कॅटरिना मुंबईवरून दिल्लीला रवाना झाले आहेत.

सलमान आणि कॅटरिना मुंबईमधील कलिना विमानतळावर स्पॉट झाले आहेत. दोघेही ‘टायगर ३’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण करणार आहेत. यावेळी कॅटरिनाने काळ्या रंगाची लेदरची पँट आणि पांढऱ्या रंगाचा टॉप घातला होता तसेच पायात पांढऱ्या रंगाचे शूज घातले होते. तसेच सलमान खान काळ्या रंगाचा टी-शर्ट जीन्स आणि जॅकेटमध्ये होता. दोघेही खूपच कॅज्युअल परंतु स्टायलिश दिसत होते.

कॅटरिना कैफने शूटिंग पूर्ण करण्याआधी मुंबईमधील तिच्या घरी तिचा पती विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला. लग्नानंतर तिचा हा पहिलाच ‘व्हॅलेंटाईन डे’ होता. त्यामुळे तिने तो पतीसोबत एन्जॉय केला. यशराज फिल्म्स आणि मनीष शर्मा यांनी नियोजन केल्यानुसार या चित्रपटातील काही खास सीन दिल्लीमधील खास लोकेशनवर शूट केले जाणार आहेत.

दिल्लीमध्ये उरलेली ही खास शूटिंग जवळपास २ आठवडे चालू शकते. त्यानंतर ‘टायगर ३’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण होणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे, याची माहिती अजून समोर आली नाही. परंतु हाती आलेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे निर्माते हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी घाई करणार नाहीत. बिग बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट हिंदी आणि इंग्लिशसोबत बाकी अनेक भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे सलमान आणि कॅटरिनाचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. याआधी देखील त्या दोघांना अनेकवेळा चाहत्यांनी एकत्र पाहिले आहे. त्यांची जोडी सगळ्यांना खूप आवडते. आता पुन्हा एकदा त्यांना एकत्र चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

हेही वाचा

हेही पाहा-

हे देखील वाचा