Thursday, April 10, 2025
Home अन्य ‘तिचं नाव सुद्धा आठवत नाहीये…’, रणवीर सिंगच्या गर्लफ्रेंडबद्दलच्या ‘या’ प्रश्नावर सलमान खानचं तडकीफड उत्तर

‘तिचं नाव सुद्धा आठवत नाहीये…’, रणवीर सिंगच्या गर्लफ्रेंडबद्दलच्या ‘या’ प्रश्नावर सलमान खानचं तडकीफड उत्तर

अखेर तो शो सुरु झालाच ज्याची सर्वच प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. ‘बिग बॉस १५’चा ग्रँड प्रीमियर नुकताच झाला आणि विविध क्षेत्रातून आलेल्या स्पर्धकांनी या घरात प्रवेश केला. १४ सिझन यशस्वीरित्या झालेल्या या शोच्या १५ व्या सिझनची वाट मागील बऱ्याच काळापासून पाहिली जात होती. मात्र आता सर्वांची उत्सुकता शमली असून, बिग बॉस १५ ला दणक्यात सुरूवात झाली आहे. या पर्वाचा होस्ट देखील वन अँड ओन्ली सलमान खानच आहे. अतिशय विवादित असणाऱ्या या शोमध्ये सतत भांडणं, आरडाओरडी होत असून देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यामध्ये हा शो सर्वात पुढे असतो.

बिग बॉसमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळते. नुकत्याच संपन्न झालेल्या या शोच्या प्रीमियरला सलमानच्या सूत्रसंचालनाने आणि स्पर्धकांच्या खास ओळखीमुळे अधिकच रंजक बनवले. यावेळेस या शोच्या पहिल्या भागात सलमानसोबत अभिनेता रणवीर सिंगदेखील दिसला. या पहिल्या भागात रणवीर त्याच्या येणाऱ्या शोचे प्रमोशन करण्यासाठी आला होता. यावेळी रणवीरने सलमानसोबत खूप मस्ती केली, गेम खेळला.

याच दरम्यान त्याने सलमानला त्याचा बजरंगी भाईजान सिनेमातील एक फोटो दाखवला आणि विचारले की, या सिनेमात तुझ्या गर्लफ्रेंडचे नाव काय होते? हा प्रश्न ऐकल्यावर सलमान विचारात पडला. आणि हसत हसत म्हणाला मला माझ्या या सिनेमातील गर्लफ्रेंडचे नावच नाही आठवत. तो रणवीरला म्हणाला, बजरंगीच्या गर्लफ्रेंडचे नाव विचारतोय, तो तिला मॅडमजी म्हणतो. पुढे सलमान म्हणतो, ‘सॉरी करीना मला खरंच आठवत नाही.’ या चित्रपटात तिच्या भूमिकेचे नाव ‘रसिका’ होते. मात्र सलमानला हे नाव आठवलेच नाही.

बिग बॉस १५ मध्ये शमिता शेट्टी, निशांत भट, प्रतीक सहजपाल, करण कुंद्रा, जय भानुशाली, डोनल बिष्ट, उमर रियाज, तेजस्वी प्रकाश, ईशान सहगल, सिम्बा नागपाल, साहिल श्रॉफ, अफसाना खान, अकासा सिंग, मीशा अय्यर, विधि पांड्या आदी कलाकार सहभागी झाले आहे. आता तर शोची सुरूवात झाली. अजून तर शोला रंग चढेल आणि नंतर शोची मजा अधिकच वाढेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला

-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ

-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…

हे देखील वाचा