Friday, October 18, 2024
Home बॉलीवूड ‘चुलबल पांडे’ अन् ‘बाजीराव सिंघम’ रुपेरी पडद्यावर दिसणार एकत्र? वाचा काय म्हणाला रोहित शेट्टी

‘चुलबल पांडे’ अन् ‘बाजीराव सिंघम’ रुपेरी पडद्यावर दिसणार एकत्र? वाचा काय म्हणाला रोहित शेट्टी

कलर्स टीव्हीवरील सर्वात मोठा रियॅलिटी शो ‘बिस बॉस १५’ खूप लोकप्रिय आहे. या शोमध्ये वीकेंडला रोहित शेट्टी, अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ हे त्यांच्या ‘सुर्यवंशी’ या चित्रपटाचे प्रमोशनसाठी आले आहेत. यावेळी रोहित शेट्टीने सांगितले की, त्याला सलमान खान आणि अजय देवगणसोबत मिळून एक चित्रपट बनवायचा आहे. यावेळी तो सलमानला बोलला की, त्याला प्रॉमिस करावे लागेल की, तो लवकरच त्याच्यासोबत चित्रपट करेल.

सलमान खान आणि अजय देवगण यांनी मिळून अनेक चित्रपटात काम केले आहे. परंतु त्या दोघांनी मिळून कधी रोहित शेट्टीच्या चित्रपटात काम केले नाही. त्या दोघांनी ‘हम दिल दे चुके सनम’, ‘लंडन ड्रीम्स’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. परंतु त्यांनी रोहित शेट्टीसोबत काम केले नाही. यावेळी रोहित शेट्टी म्हणाला की, ते दोघे अनेकवेळा भेटतात पण एकत्र काम करत नाही. (Salman Khan and Rohit Shetty to join hands together and make a film with chulbul pandey and Bajirao singham)

‘बिग बॉस १५’ च्या मंचावर रोहित शेट्टीने सलमान खानसोबत मिळून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यावेळी रोहित शेट्टीने सलमानकडून एक नाही तर दोन प्रॉमिस घेतले. एक तर चित्रपट बनवण्याचे आणि दुसरे प्रॉमिस खूपच मजेशीर आहे. सलमान खान हा मागील अनेक वर्ष ‘बिग बॉस’ हा शो होस्ट करतो, तर रोहित शेट्टी ‘खतरों के खिलाडी’ हा शो होस्ट करतो. या शोचे आतापर्यंत ८ पर्व पूर्ण झाले आहेत.

यावेळी रोहित सलमानला म्हणाला की, “मी दर वर्षी बिग बॉसमध्ये येतो. परंतु तू आजपर्यंत कधीच माझ्या शोमध्ये आला नाही.” रोहित शेट्टीची ही तक्रार ऐकून सलमान म्हणाला की, “अरे माझा शो इथे भारतातच असतो तुमचा शो भारताबाहेर शूट केला जातो, तर मी माझा शो सोडून तिकडे कसा काय येऊ शकतो.” परंतु रोहित शेट्टी त्याचे काहीही ऐकत नाही आणि त्याच्याकडून ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये येण्याचे प्रॉमिस घेतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कॅटरिना कैफने सलमान खानवर लावले ‘हे’ आरोप, अभिनेत्याची प्रतिक्रियाही होती बघण्यासारखी

-जेव्हा अजय देवगणने पहिल्या भेटीतच काजोलला केले होते रिजेक्ट, तिला पुन्हा भेटायची नव्हती त्याची इच्छा

-रोहित शेट्टीने रणवीर सिंगला ‘सूर्यवंशी’मधून रोल कट करण्याची दिली धमकी, काय आहे प्रकरण?

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा