×

ऐश्वर्याच्या प्रेमात वेडा झालेल्या सलमानला सिनेमाच्या कथेतही तिच्यापासून व्हायचं नव्हतं वेगळं; थेट डायरेक्टरला…

हिंदी चित्रपट जगतातील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्यांमध्ये सलमान खानच्या नावाचा समावेश होतो. सलमानच्या चित्रपटांची चर्चा तर होतेच, त्याचबरोबर सलमानच्या प्रेमप्रकरणांचीही नेहमीच चर्चा होत असते. अभिनेत्री कॅटरिना कैफ ते जॅकलिन फर्नांडिस अशा अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत सलमानचे नाव जोडले गेले होते. मात्र, सर्वात जास्त चर्चा झाली ती, सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रेम प्रकरणाची. दोघांच्या प्रेमाचे अनेक किस्से आजही सांगितले जातात. त्यातलाच एक गाजलेला किस्सा आज आपण या लेखातून पाहणार आहोत.

हिंदी चित्रपट जगतातील सर्वात गाजलेली लव्हस्टोरी म्हणून सलमान खान (Salman Khan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya rai) यांच्या नावाची चर्चा होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र, दोघांमध्ये झालेल्या वादाने त्यांचे नाते संपुष्टात आले. याच प्रेमप्रकरणामुळे सलमान खान आणि विवेक ऑबेरॉय यांच्यात वाद झाला होता.

सलमान खान ऐश्वर्याच्या प्रेमात इतका बुडाला होता की, तिला दुसऱ्या कोणत्या अभिनेत्यासोबत चित्रपट करायलाही त्याने मज्जाव केला होता. दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. मात्र, त्यांच्या प्रेमाची सुरूवात ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातूनच झाली होती. चित्रपटातील दोघांच्याही अभिनयात आलेला जिवंतपणा त्यांच्या खऱ्या प्रेमाची साक्ष देत होता. याच चित्रपटादरम्यान हा किस्सा गाजला होता.

‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या कथेवरून हा वाद सुरू झाला होता. या चित्रपटात सलमान आणि ऐश्वर्या दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र, त्यांना घरच्यांच्या आणि समाजाच्या विरोधामुळे एकमेकांपासून दूर जावे लागते. त्यामुळे ऐश्वर्याचे लग्न अजय देवगणसोबत होते. काही काळाने त्यालाही त्यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती कळते.  दोघांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. मात्र, तोपर्यंत ऐश्वर्याच आपल्या पतीच्या म्हणजेच अजय देवगणच्या प्रेमात पडते, अशी कथा दाखवण्यात आली होती. मात्र, या कथेवर सलमान खान नाराज होता. कारण, त्याला चित्रपटाचा शेवट असा नको होता. त्याच्या मते चित्रपटात त्याचे आणि ऐश्वर्याचे लग्न व्हावे अशी कथा दाखवायला हवी होती. यासाठी सलमान खानने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याशी वादही घातला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post