सगळीकडे शुक्रवारी (१४ मे) ईदचा सण आनंदाने साजरा केला गेला. अशातच अनेक कलाकारांच्या घरी देखील ईद साजरी केली. बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान याच्या घरी देखील आज धूमधडाक्यात ईद साजरी करण्यात आली. परंतु तो कोरोना लसीचा दुसरा डोस घ्यायला गेला होता. आताच सलमान खानचा ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या आधी तो प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त होता. परंतु आता जेव्हा त्याला त्याच्या कामामधून वेळ मिळाला आहे, तर तो लगेच कोरोना लस घ्यायला गेला आहे.
सलमान खानचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो दादरच्या वॅक्सिनेशन सेंटरमध्ये जाताना दिसत आहे. सलमान खान हा इतरांना देखील लस घेण्याचा सल्ला देत आहे. सलमान खानने सांगितले की,”मी कोणी तज्ञ नाहीये तरीही देखील सांगतो की, एक जरी व्यक्ती कोरोना बाधित राहिला, तरीही ही परिस्थिती अशीच राहणार आहे. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा सगळेजण लस घेतील. सलमान खानच्या आई- वडिलांचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. एप्रिल महिन्यात त्याच्या बहिणीला अर्पिताला कोरोना झाला होता.
दुसरीकडे त्याच्या घरी ईद साजरी होत आहे. सलमान खानची आई आणि बहीण अर्पिता शर्मा देखील या निमित्त त्याच्या घरी आल्या होत्या. अर्पिता सोबत तिची दोन्ही मुले देखील होती.
सलमान खानचा राधे हा चित्रपट जवळपास एक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आता प्रदर्शित झाला आहे. अपेक्षे प्रमाणेच सर्वांना हा चित्रपट खूप आवडला आहे. हा चित्रपट भारतात चित्रपटगृहात तर प्रदर्शित होऊ शकला नाही. पण परदेशात सलमान खानचा दम पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळाला आहे. या चित्रपटातला प्रदर्शित झाला त्या दिवशी बरोबर 12 वाजता 1.5 मिलियन प्रेक्षकांनी झी 5 वर पहिला होता. या चित्रपटाने 50 लाख डॉलर म्हणजेच 2.94 कोटी एवढी कमाई केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सरोज खान यांच्या आठवणीत ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित झाली भावुक; म्हणाली…
-‘या गरीब मुलासोबत काय करतेय?’ बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर अनुराग कश्यपची मुलगी ट्रोल