Sunday, February 23, 2025
Home अन्य वाह क्या बात!! बसंती झाली राखी, विरु बनले धर्मेंद्र आणि सलमान साकारला गब्बर

वाह क्या बात!! बसंती झाली राखी, विरु बनले धर्मेंद्र आणि सलमान साकारला गब्बर

कलर्स वाहिनीवरील बिग बॉसचा विजेता कोण होणार याची सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. या महाअंतिम सोहळ्याची सलमान खानने अगदी दिमाखदार शैलीत सुरवात केली. सर्वच स्पर्धकांच्या नातेवाइकांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सोबतच रितेश देशमुख ,धर्मेंद्र आणि नोरा फतेही या कलाकारांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावून हा सोहळा अधिकच संस्मरणीय केला.

या कार्यक्रमात सुरुवातीला सर्व स्पर्धकांचे मजेदार किस्से सांगण्यात आले. या महाअंतिम सोहळ्यात सुरवातीला राखी सावंत बिग बॉसच्या घरातून बेघर झाली. राखी १४ लाख रुपये घेऊन बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. राखी सावंत नंतर अली गोनी हा कमी मते मिळाल्यामुळे बिग बॉसच्या घराबाहेर पडला. अली गोनी बाहेर पडल्यामुळे घरातील सदस्य देखील चकित झाले. अलीनंतर निक्की तांबोळी देखील काही वेळाने बेघर झाली. त्यानंतर फक्त राहुल वैद्य आणि रुबिना दिलैक हे दोनच स्पर्धक घरात राहिले होते.

दरम्यान, या महाअंतिम सोहळ्यात बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी खास हजेरी लावली होती. यात सलमान खानने धर्मेंद्र यांच्या समवेत ‘मै जट यमला पगला दिवाना’ या गाण्यावर नृत्य केले. त्यानंतर ‘शोले’ चित्रपटाचा देखावा साकारण्यात आला, ज्यात सलमान खानने गब्बरचे पात्र साकारले तर दुसरीकडे राखी सावंत बसंतीच्या भूमिकेत दिसली. सोबतच नोरा फतेहीचा नाच देखील प्रेक्षकांना पहावयास मिळाला.

बिग बॉसच्या विजेत्याला पन्नास लाख रुपये रोख रक्कम मिळणार होती. या स्पर्धेची सुरवात होताच राखी ही सर्वप्रथम बेघर झाली. बिग बॉसने अंतिम स्पर्धकांसमोर एक पर्याय ठेवला होता. ज्यात या घरात शिरल्यावर रितेश देशमुख याने घरातील व्यक्तींच्या समोर चौदा लाख रुपयांची सुटकेस ठेवला. तो म्हणाला की, ‘जो कोणी हा सुटकेस घेईल ती व्यक्ती या कार्यक्रमाच्या बाहेर जाईल आणि राखी सावंतने चौदा लाख रुपयांचा स्वीकार केला आणि ती घराबाहेर गेली.’

राखी बाहेर पडल्यानंतर अली गोनी देखील बाहेर पडला. त्यामुळे फक्त अंतिम फेरीसाठी रुबिना, राहुल आणि निक्की राहिले होते. परंतु कालांतराने निक्कीला देखील हा कार्यक्रम सोडावा लागला आणि ती सुद्धा बेघर झाली. त्यानंतर बिग बॉस १४ ची विजेता म्हणून रुबिना दिलैकची घोषणा करण्यात आली. तर राहुल वैद्य उपविजेता ठरला.

या स्पर्धेत रुबिना सर्वाधिक चर्चेत राहिली होती. प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवायला तिने काहीच कसर सोडली नाही आणि त्याच जोरावर बिग बॉसची ट्रॉफी तिच्या नावावर झाली. सोबतच ३६ लाख रुपयांच्या बक्षीसाची देखील ती मानकरी ठरली. हा महाअंतिम सोहळा खूपच रंगतदार चालू होता. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या ह्या सोहळ्याने स्पर्धेचा शेवट देखील तितकाच अविस्मरणीय केला होता.

हे देखील वाचा