Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड घरासमाेर घडली भीषण घटना !

घरासमाेर घडली भीषण घटना !

सलमान खानने (Salman Khan)अलीकडेच आपल्या गाड्यांच्या गॅरेजमध्ये एक नवी गाडी घेतली आहे. ही गाडी बुलेटप्रूफ आहे आणि तिची किंमत ऐकून कोणालाही धक्का बसेल, ती अनेक कोटींची आहे!

बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान कित्येक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करतोय आणि खूप ऐशारामाचं जीवन जगतो. अलीकडेच त्याने आपल्या लक्झरी गाड्यांच्या कलेक्शन मध्ये एक भन्नाट गाडी खरेदी केली आहे. सलमानने बुलेटप्रूफ मर्सिडीज-मेबॅक GLS 600 SUV घेतलीय. या गाडीची किंमत ऐकली की कुणालाही थक्क व्हायला होतं!

काही काळापूर्वी, सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. अगदी त्याच्या घरावर काही लोकांनी गोळीबारही केला होता. या घटनेनंतर सलमानने आधी आपल्या घराची सुरक्षा वाढवली आणि आता स्वतःसाठी बुलेटप्रूफ गाडी घेतली आहे. ही गाडी सध्या साधारण 3.40 कोटी रुपये सांगितली जात आहे, जी काही साइड अभिनेत्याच्या संपूर्ण वर्षाच्या कमाईपेक्षा जास्त असू शकते.

ही गाडी त्याच्या सुरक्षिततेसाठीच घेतली गेली आहे. यात खूप सारे लक्झरी फीचर्स आहेत आणि गाडी दिसायलाही खूपच भारी आहे!

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा  

कनप्पा साठी मोहनलाल आणि प्रभास यांनी फुकटात केले काम; अक्षय कुमारने घेतली सर्वात जास्त फी …

हे देखील वाचा