Thursday, June 12, 2025
Home बॉलीवूड शाहरुखवर भाईजान भारी? ‘पठाण’मध्ये सलमानच्या एन्ट्री चित्रपटगृहांमध्ये एकच कल्ला, व्हिडिओ झाले व्हायरल

शाहरुखवर भाईजान भारी? ‘पठाण’मध्ये सलमानच्या एन्ट्री चित्रपटगृहांमध्ये एकच कल्ला, व्हिडिओ झाले व्हायरल

अखेर आज (२५ जानेवारी) शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित ‘पठाण’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. मागील अनेक महिन्यांपासून पठाणची जोरदार चर्चा होती. आज सिनेमा प्रदर्शित होत असून, शाहरुखच्या फॅन्समध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग हॉउसफ़ुल्ल झाल्यानंतर सिनेमा पहिल्या दिवशी बंपर कमाई करणार हे आधीच सांगितले जात होते. मात्र आज हे प्रत्यक्ष पाहायला मिळाले. तब्बल चार वर्षांनी शाहरुख खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे सर्वच फॅन्स आतुर होते. या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना आणि सलमान, शाहरुख खानच्या फॅन्सला या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी ‘पठाण’ने दिली आहे. या सिनेमात सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असून, जवळपास २० मिनिटांची त्याची सिनेमात भूमिका आहे.

 

सध्या सोशल मीडियावर पठाण सिनेमातील अनेक क्लिप्स व्हायरल होताना दिसत असून, त्यात सर्वात जास्त क्लिप्स या सलमान खानच्या आहेत. सलमान खानने सिनेमात जे सीन केले त्या सीनच्या त्या क्लिप्स आहेत. दरम्यान या सर्व क्लिप्स पहिल्या तर जाणवेल की सलमान खानच्या एन्ट्रीला चित्रपटगृहांमध्ये नुसता कल्ला झाला. शिट्ट्या, टाळ्या, आरडा ओरड आदींनी चित्रपटगृह गजबजून गेली होती. अनेकांनी सलमानची २० मिनिटाची भूमिका पूर्ण सिनेमावर हावी झाल्याचे सांगितले तर, काहींनी चित्रपटाची जण सलमान खान सांगितले आहे. २० मिनिटात सलमान खानने सिनेमावर त्याची छाप सोडल्याचे देखील अनेकांनी सांगितले आहे.

दरम्यान आजपर्यंत अनेकदा सलमान खान आणि शाहरुख खान यांनी एकमेकांच्या चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका केली आहे. अगदी कुछ कुछ होता है पासून ते झिरो, हर दिल जो प्यार करेगा, ट्युबलाइट आदी अनेक चित्रपटांचा या यादीत समावेश आहे. या दोघांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहणे म्हणजे त्यांच्या फॅन्सला एक ट्रीटच असणार आहे. शिवाय सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाचा टिझर देखील पठाणमध्ये दाखवला जाणार आहे.

हेही वाचा-दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Oscar Nomintaions 2023: भारतामधील ‘नाटू नाटू’ गाण्याशिवाय ‘या’ डॉक्युमेंट्रीलाही जाहीर ऑस्कर नामांकन
‘मी अक्षरशः मला विसरते…’ म्हणत मधुराणी प्रभुलकरने शेअर केली तिला स्वतःचाच विसर पडणाऱ्या गोष्टीची पोस्ट

हे देखील वाचा