सलमान खान (Salman Khan) हा हिंदी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि डॅशिंग भूमिकांमुळे सलमान खानने बॉलिवूडमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. म्हणूनच त्याला बॉलिवूडचा दबंग म्हणून ओळखले जाते. 90 च्या दशकातील अनेक चित्रपटांनी सलमान खानला सुपरस्टार होण्यास मदत केली. त्यामधीलच एक चित्रपट म्हणजे ‘बीवी हो तो ऐसी’. या चित्रपटाने सलमान खानला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. परंतु हा चित्रपट सलमान खानला करायचा नव्हता, तरीही या चित्रपटासाठी त्याचे नाव लागण्याचीही एक रंजक कहाणी आहे तिच आपण जाणून घेउया.
‘बीवी हो तो ऐसी’ चित्रपटाचे दिग्दर्शन जे.के. बिहारी यांनी केले होते. हा चित्रपट १९८८ ला प्रदर्शित झाला होता. चित्रपटातील रेखाच्या मेव्हण्याच्या भूमिकेसाठी बिहारी नवख्या कलाकाराच्या शोधात होते. यासाठी ऑडिशनही झाले, पण पहिल्या दिवशी ऑडिशनसाठी कोणीही पोहोचले नाही. हे पाहून बिहारी इतका निराश झाले होते. याच निराशेतून त्यांनी आता ऑफिसमध्ये पहिल्यांदा जी व्यक्ती येईल त्यालाच ही भूमिका अशीच घोषणा करुन टाकली.योगायोगाने ऑफिसमध्ये पोहोचणारा सलमान खान पहिला माणूस ठरला.
सलमान खान ऑफिसमध्ये येताच दिग्दर्शक बिहारींनी त्याचे अभिनंदन करत तुला चित्रपटासाठी साईन केल्याचे सांगून टाकले. सुरुवातीला सलमानला हा विनोद वाटला, पण लवकरच तो चित्रपटासाठी निवडला गेल्याची त्याची खात्री पटली. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान त्याच्या अभिनयाने खूपच निराश झाला होता. हा चित्रपट फ्लॉप व्हावा आणि कोणीही पाहू नये, अशी सलमानची इच्छा होती. पहिल्या चित्रपटावर नाराज झाल्यानंतर सलमानने वडिलांना चित्रपट बनवून पुन्हा लॉन्च करण्याची विनंती केली.
त्यानंतर सलमानचा ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला देशभरात ओळख मिळाली. पण सलमानला हा चित्रपट करायचा नव्हता. चित्रपट सुरू होण्यापूर्वी सलमानने दिग्दर्शक सूरज बडजात्याला फोन केला आणि तुझे वडील राजकुमार बडजात्या यांनी चित्रपटात खूप पैसा खर्च केला आहे, त्यांचे सर्व पैसे माझ्यामुळे बुडावेत असे मला वाटत नाही. असे सांगितले होते. पण चित्रपट प्रदर्शित होताच हा चित्रपट सुपरहीट ठरला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा