Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड सलमान खानने संगीतकार वाजिदच्या वाढदिवसाच्या दिवशी केक कापत वाहिली श्रद्धांजली

सलमान खानने संगीतकार वाजिदच्या वाढदिवसाच्या दिवशी केक कापत वाहिली श्रद्धांजली

 

बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार आणि गायक असणाऱ्या वाजिद खानचे मागच्यावर्षी जूनमध्ये निधन झाले. वाजिद खानच्या निधनामुळे संपूर्ण संगीत क्षेत्राला आणि बॉलीवूडला मोठा धक्का बसला. वाजिद हा सलमान खानच्या खूप जवळ होता. नुकताच वाजिदचा वाढदिवस साजरा झाला. सलमान खान, साजिद खान यांनी मिळून वाजिदचा वाढदिवस साजरा केला आणि त्याला श्रद्धांजली वाहिली. सलमान खानने गेल्यावर्षी प्रमाणे ह्यावर्षी देखील साजिद खानचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ संगीतकार साजिद खानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये सलमान खानसोबत लुलिया वंतूर देखील दिसत आहे. शिवाय हे सर्व लोकं बर्थडेचे गाणे गट वाजिदला आठवत केक कापताना दिसत आहे.

केक कापत असल्याचा व्हिडिओ साजिदने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत लिहिले, “कोणाला किती आणि कसं सांगायच की, तू आम्हाला किती प्रिय होतास. तुझ्यावर आमचं खूप प्रेम आहे. संपूर्ण जगाचे तुझ्यावर प्रेम आहे.” असे भावनिक कॅप्शन त्याने दिले आहे. वाजिद खान आणि सलमान खान यांचे खूप जुने आणि घनिष्ठ नाते आहे. साजिद आणि वाजिद या संगीतकार जोडीने सलमानच्या चित्रपटातून त्याच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली होती.

सलमानच्या अनेक चित्रपटांना या दोघांनी मिळून संगीत दिले आणि गाणी देखील गायली. याशिवाय त्यांनी इतरही अनेक चित्रपटांना संगीत दिले. त्यांची सर्वच गाणी तुफान हिट झाली आहेत. ‘दबंग’, ‘वॉन्टेड’, ‘वीर’, ‘नो प्रॉब्लम’, ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’, ‘पार्टनर’, ‘एक था टाइगर’, ‘दबंग’, ‘दबंग2’, ‘दबंग 3’, ‘पार्टनर’, ‘सन ऑफ सरदार’, ‘राऊडी राठोड’, ‘हाऊसफुल्ल 2’ आदी अनेक चित्रपटांच्या या यादीत समावेश आहे. साजिद-वाजिद यांना इंडस्ट्रीमध्ये आणण्याचे काम सलमानच केले. या दोघंही देखील त्याच्या विश्वासाला सार्थ ठरवत त्यांच्या धमाकेदार संगीताने सर्वांनाच वेड लावले.

वाजिदच्या निधनानंतर साजिद त्याचे संगीत देण्याचे आणि गाण्याचे काम करत आहे. तो अनेक सिंगिंग शोमध्ये परीक्षक म्हणूनही दिसत असतो. म्युझिकल शो ‘इंडियन प्रो लीग’मध्ये साजिदला वाजिदच्या आठवणींना उजाळा देताना दिसला. तो म्हणाला की, “माझ्या सोबत तो नेहमी असायचा आज मी एकटाच आहे” असं म्हणत तो भावुक होऊन रडायला लागला. हा पहिला शो असा होता की जेथे साजिद-वाजिद ही जोडी दिसली नाही.

साजिद जेव्हा हॉस्पिटलमध्ये होता त्यावेळेस त्याने एक शेवटचं गाणं पेटी वाजवत गेले होते आणि ते गाणे म्हणजे सलमानच्या दबंग सिनेमातील ‘हूड हूड दबंग दबंग’. हे गाणे गात असल्याचा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

अमिताभ यांच्यासोबत असणाऱ्या अफेयरच्या प्रश्नावर उत्तर देताना रेखा म्हणाल्या होत्या…

आसामच्या फ्लोरिना गोगोईने पटकावले ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’चे विजेतेपद

यूरोपच्या जंगलांमध्ये बंडखोरीच्या प्रयत्नात दिसला अभिनेता विकी कौशल, फोटो व्हायरल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा