Thursday, June 12, 2025
Home बॉलीवूड सलमान खानला जिवेमारण्याची धमकी देणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीस मुंबई पोलिसांनी 8 तासानंतर केली अटक

सलमान खानला जिवेमारण्याची धमकी देणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीस मुंबई पोलिसांनी 8 तासानंतर केली अटक

सलमान खानला धमकी मिळण्याचा सिलसिला काही कमी होत नाही. त्याला सतत वेगवेगळ्या लोकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहे. १० एप्रिल रोजी देखील त्याला अशीच एक धमकी मिळाली. मात्र ही धमकी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमकडे फोन करत देण्यात आली. ३० एप्रिलला त्याला मारण्याचे या फोनवर सांगितल्या गेले.

या धमकीच्या फोन कॉल नंतर मुंबई पोलिसांनी लगेच चौकशी आणि तपासणी करायला सुरुवात केली. ८ तासांच्या मोठ्या ऑपरेशनंतर आणि १० किलोमीटर पर्यंत सदर व्यक्तीचा पाठलाग केल्यानंतर त्या धमकी देणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात यश आले. मुंबई पोलिसांना १० एप्रिलला रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोलमध्ये फोन आला. यात त्या व्यक्तीने सांगितले की, ३० एप्रिलला तो सलमान खानला मारणार आहे. त्यानंतर पोलिसांना जाग आली. त्या धमकी देणाऱ्या व्यक्तीला पकडण्यासाठी ३ टीम बनवल्या आणि शोध सुरु झाला.

पोलिसाना देखील त्याच्या या ऑपरेशनमध्ये यश आले आणि त्यांनी धमकी देणाऱ्यास अटक केली. याप्रकरणी तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी तपास केला आणि त्या व्यक्तीला ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधील पडघा गावातून अटक झाली. पोलिसांना पाहताच तो सादर व्यक्ती दुचाकीवरून पळ काढत होता. पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्यानेच धमकीचा दूरध्वनी केल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान येत्या २१ एप्रिलला सलमान खानचा किसी का भाई किसी की जान सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

दुःखद! प्रसिद्ध रंगभूमिकार आणि अक्षरा थिएटरच्या सहसंस्थापक असलेल्या ‘या’ जेष्ठ अभिनेत्रींचे निधन

वयाच्या 15 व्या वर्षी केले सिनेसृष्टीत पदार्पण, लग्न करताना धर्मांतर करून आयशा टाकियाने केले सर्वाना आश्चर्यचकित

हे देखील वाचा