Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड सलमान खानला धमकी मिळाल्यानंतर ‘ऍक्शन मोड’मध्ये मुंबई पोलीस, अभिनेत्याने नोंदवले बयान

सलमान खानला धमकी मिळाल्यानंतर ‘ऍक्शन मोड’मध्ये मुंबई पोलीस, अभिनेत्याने नोंदवले बयान

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) धमकी मिळाल्यापासूनच मुंबई पोलीस ऍक्शन मोडमध्ये आहेत. रविवारी (५ जून) सलमान खानचे वडील सलीम खान (Saleem Khan) यांना धमकीचे पत्र मिळाले असून, त्यात अभिनेत्याचा सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अभिनेत्याचे घर ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’ची सुरक्षा वाढवली असून, आता पोलिसांनी याप्रकरणी सलमान खानचा जबाबही नोंदवला आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी या संपूर्ण प्रकरणात सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांचे जबाब नोंदवले आहेत. याशिवाय पोलिसांनी सलमान खानचे भाऊ सोहेल खान (Sohail Khan) आणि अरबाज खान (Arbaaz Khan) यांचेही जबाब नोंदवले आहेत. या संपूर्ण घटनेबाबत पोलिसांनी आतापर्यंत एकूण चार जणांचे जबाब नोंदवले आहेत. (salman khan death threat case mumbai police has recorded the statement)

रविवारी (५ जून) सलमान खानचे वडील सलीम खान चालायला गेले असता, त्यांना सकाळी ८ वाजता धमकीचे पत्र मिळाले. हे पत्र त्याच बाकावर ठेवले होते, जिथे ते फिरल्यानंतर बसतात. या पत्रात सलमान खानची अवस्था गायक सिद्धू मुसेवालासारखी करण्याबाबत लिहिले होते. एवढेच नाही, तर या पत्रात ‘G B L B’ देखील लिहिले होते. अशा परिस्थितीत आता हे पत्र गोल्डी बरार आणि लॉरेन्स बिश्नोई यांचे आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत.

मात्र, या सगळ्या घटनांमध्ये सलमान खान आपले काम सोडायला काय तयार नाही. एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, सलमान खान ‘कभी ईद कभी दिवाली’च्या टीमसोबत हैदराबादला रवाना होऊ शकतो. इथे सलमान खान पूर्ण २५ दिवस शूटिंग करणार आहे. त्यानंतर तो मुंबईला परतेल. परतल्यानंतर सलमान खान त्याच्या ‘टायगर ३’ चित्रपटाच्या शेड्यूलमध्ये सामील होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा