Saturday, June 29, 2024

“अपमान, सर्व प्रकारचा छळ आणि…” सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

सलमान खान बॉलिवूडचा दबंग खान तो जवळपास तीन पेक्षा अधिक दशकं झाली सलमान बॉलिवूडवर राज्य करत आहे. या एवढ्या मोठ्या काळात सलमान जेवढा त्याच्या चित्रपटांमुळे गाजला तेवढाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि त्याच्या प्रेम प्रकरणांमुळे देखील प्रकाशझोतात आला. असे त्याचे सर्वात जास्त गाजलेले एक नाते म्हणजे अभिनेत्री सोमी अलीसोबतचे. ९० च्या दशकात सोनीने चांगलीच लोकप्रियता आणि यश कमावले. सलमान खानची गर्लफ्रेंड म्हणून देखील ती ओळखली जाऊ लागली.

मात्र नंतर सोमी अली अचानक सिनेक्षेत्रातून आणि सलमानच्या आयुष्यामधून गायब झाली. आता पुन्हा ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे लाइमलाईट्मधे येत आहे. सोमी सतत सलमान खानवर अप्रत्यक्षरीत्या पोस्ट करत त्याच्यावर विविध आरोप लावत आहे. सोमीने पुन्हा एकदा एक मोठी पोस्ट लिहीत अनेक खुलासे केले आहे, ज्यात तिने तिला सोशल मीडिया पोस्ट काढून टाकण्यासाठी होत असलेल्या दबावाबद्दल देखील सांगितले आहे. यामुळे मोठी चर्चा सुरु झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Somy Ali (@realsomyali)

सोमीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “मला काढून टाकण्यास सांगितले जाईल. माझ्या विवेकाबद्दल मला विचारणा होईल. मला मद्यपानाची समस्या असल्यामुळे माझ्याबद्दल अनेक चर्चा होती. मात्र तरीही मी पुढे जाणार कारण तुम्ही अशा प्रकारचा अपमान, सर्व प्रकारचा छळ आणि अत्याचार सहन केलेला नाही. कोणीच माझी बाजू घेणार नाही कारण लोक विचार करतात की, तुमच्यासोबत चुकीचे वागणारा मोठा स्टार आहे आणि तुम्ही त्याचे मित्र आहात. तो स्टार तुमचे करियर बनवू शकतो आणि खराब देखील करू शकतो.”

पुढे सोमीने लिहिले, “मी एका चांगल्या व्यक्तीबद्दल सांगते, ज्याने मला सांगितले होते की, हा गैरवर्तन करणारा व्यक्ती खूपच प्रेमळ आहे. लक्षात घ्या मी इथे एका अभिनेत्याबद्दल बोलत असून, त्याच्याबद्दल मला खूप आदर आहे. मात्र मला हे माहित आहे की, तो बंधनात आहे. तुम्ही लोकं मला कधीच शांत करु शकणार नाही. ह्याचाही शेवट असेल, हे एका आनंदी शेवट असलेल्या भयपटासारखे आहे. मला ट्रोल करण्याआधी आणि माझ्याबद्दल वाईट शब्द लिहायला सुरुवात करण्यापूर्वी, मी तुम्हाला सांगते की, मी ते काहीच वाचत नाही आणि माझ्याकडे वेळ देखील नाही.’

पुढे सोमीने लिहिले, “मला आलेला अनुभव चांगला की वाईट हे तुम्हाला माहीत नाही. ज्याने तुम्हाला काही केले नाही अशा व्यक्तीबद्दल तुम्ही फक्त अंदाज बांधत आहात. यावर नक्कीच थोडा विचार करा. हे फक्त माझ्यासाठी नाही तर अनेकांसाठी आहे, ज्यांना माझ्यासारखे ऑनलाइन धमकावले जाते. हे थांबायला हवे.”

दरम्यान याआधी देखील सोमीने अशा अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या ज्यामध्ये तिने सलमान खानवर निशाणा साधला होता. आता यावर कोणाच्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहावे लागेल.

अधिक वाचा-
श्वेता तिवारीच्या काळ्या साडीतील घायाळ करणाऱ्या अदा, फोटो पाहून चाहते फिदा
“नाव ‘बाईपण भारी देवा’ असलं तरी…”, अभिनेते संजय मोने यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

हे देखील वाचा