अभिनेत्री हेलन बॉलिवूडच्या एक लोकप्रिय अभिनेत्री आणि डान्सर आहेत. त्यांच्या काळात सगळ्यात सुंदर अभिनेत्रींच्या यादीत समावेश असणाऱ्या हेलन यांनी जवळपास 700 चित्रपटात काम केले आहे. त्यांनी अनेक मुख्य भूमिकेत, तसेच सहाय्यक अभिनेत्री म्हणून भूमिका निभावल्या आहेत. सोबतच त्यांच्या डान्समुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. त्यांना बॉलिवूडची पहिली ‘आयटम गर्ल’ असे म्हटले जात होते.
हेलन यांचा जन्म 21 नोव्हेंबर, 1938 साली बर्मामध्ये झाला होता. त्यांचे वडील एंग्लो इंडियन होते आणि आई बर्मिज होत्या. त्यांच्या भावाचे नाव रॉजर आणि बहिणीचे नाव जेनिफर असे होते. त्यांच्या वडिलांचा दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या दरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर 1943 साली त्यांचे कुटुंब आसाममध्ये आले. हेलन यांनी या सगळ्या गोष्टी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितल्या होत्या. त्यांनी त्यांच्या कुटुंबाचे पालन-पोषण करण्यासाठी शिक्षण सोडून दिले होते. (Salman Khan father held hands in the loneliness of Helen who was called bollywoods first item girl)
हेलन जेव्हा 19 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी ‘हावडा ब्रीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील ‘मेरा नाव चीन चीन चू’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. त्यांना बॉलिवूडमधील ‘आयटम गर्ल’ असे नाव पडले. त्याकाळी त्यांचे नाव बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्रींच्या यादीत होते. त्याकाळी त्यांना पडद्यावर बघून प्रेक्षक दीवाने होत असतं. त्यांच्या सौंदर्यासोबत त्यांच्या डान्सने देखील सगळ्यांची मने जिंकून घेतली होती. त्यांच्या या योगदानासाठी त्यांना फिल्मफेअर लाईफलाईम अचिव्हमेंट या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.
हेलन यांनी 1957 साली त्यांच्यापेक्षा 17 वर्षांनी मोठे असलेल्या प्रेम नारायण अरोरा या दिग्दर्शकासोबत लग्न केले. परंतु लग्नाच्या 16 वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांनी त्यांच्या पतीला यासाठी घटस्फोट दिला की, त्यांचा पती त्यांच्यावर ओझं झाला होता. हेलन यांनी केलेली कमाई तो स्वतः उडवत होता, ज्यामुळे हेलन यांची आर्थिक परिस्थिती खराब होत चालली होती. त्यांच्याकडे घराचे भाडे देण्यासाठी देखील पैसे शिल्लक राहिले नव्हते.
त्यांच्या घटस्फोटानंतर हेलन यांनी कितीतरी काळ एकटीने आयुष्य काढले. त्यानंतर 1962 साली ‘काबील खान’ च्या सेटवर हेलन यांची भेट सलीम खानसोबत झाली. हेलन यांचे सौंदर्य पाहून सलीम खान आपोआपच त्यांच्याकडे आकर्षित झाले. त्यानंतर त्यांच्या गाठीभेटी वाढत राहिल्या. त्यावेळी सलीम खान यांचे लग्न झाले होते. त्यावेळी त्यांची पत्नी सुशीला यांना हे नाते मान्य नव्हते, तरी देखील त्यांनी हेलन यांच्याशी विवाह केला. अनेक दिवस त्यांचे कुटंब त्यांच्यावर नाराज होते. त्यानंतर काही दिवसांनी सुशीला यांनी हेलन यांचा स्वीकार केला. एवढंच नाही तर सलमान खान हेलन यांना त्याच्या आईप्रमाणे मानतो. (salman khan father held hands in the loneliness of helen who was called bollywoods first item girl)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेता सलमान खान पास होण्यासाठी करायचा ही आयडिया, वडील सलीम खान यांनी सांगितला किस्सा
…म्हणून सलीम खान ‘जंजीर’ चित्रपटाची कहाणी सांगण्यासाठी गेले होते थेट जया बच्चन यांच्या फ्लॅटवर