Monday, July 1, 2024

दुःखद! सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, दबंग खानने पोस्ट शेअर करत वाहिली श्रद्धांजली

बॉलिवूडचा दबंग खान असलेला सलमान खान सतत विविध कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या प्रदर्शित झालेल्या किसी का भाई किसी की जान सिनेमामुळे गाजत आहे तर दुसरीकडे त्याला मिळणाऱ्या धमक्यांवर त्याने केलेल्या वक्तव्यामुळे देखील तो गाजत आहे. सलमानने भारतापेक्षा दुबई सुरक्षित असल्याचे सांगितल्यावर अनेकांनी त्याच्यावर टीका केली तर काहींनी त्याला पाठिंबा देखील दिला होता. यातच ता तो अजून एका गोष्टीमुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

नुकतीच सलमानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. झाले असे की सलमान खानने त्याच्या अकाऊंटवरून एका महिलेला श्रद्धांजली वाहिली आहे. आता ही महिला नक्की कोण? असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. आता सोशल मीडियावर ही पोस्ट वायरल झाली असून, या महिलेची ओळख जाणून घेण्यासाठी अनेकांनी सलमानला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमान खानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर रात्री उशिरा एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एका महिलेचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, “माझी प्रिय अद्दू, मी मोठा होत असताना तू मला दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. खूप प्रेम RIP”

सलमानच्या या पोस्टनंतर त्यांच्या चाहत्यांना ही अद्दु नक्की कोण? असा प्रश्न पडला आहे. काही यूजर्सनी ती सलमान खानच्या पोस्टवर ती त्याची केअर टेकर असल्याचे सांगितले आहे तर काहींनी ती सलमान खानची आया असल्याचे म्हटले आहे. मात्र याबाबत सलमानने काहीही स्पष्ट केले नाही.

दरम्यान सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्या त्याचा ‘किसी का भाई किसी की जान’ प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास अयशस्वी ठरला. आता लवकरच सलमान ‘टायगर ३’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

विकिपीडिया मावशींची ‘ही’ चूक ठरली जेष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांच्यासाठी डोकेदुखी

“सलमानसाठी सर्वात सुरक्षित जागा…” सलमान खानच्या सुरक्षेवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

हे देखील वाचा