Monday, August 4, 2025
Home बॉलीवूड ‘तो एका सामान्य माणसासारखे आयुष्य जगतो’ कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबरा यांचा सलमान खानच्या राहणीमानाबद्दल खुलासा

‘तो एका सामान्य माणसासारखे आयुष्य जगतो’ कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबरा यांचा सलमान खानच्या राहणीमानाबद्दल खुलासा

सध्या सलमान खान हा त्याला मिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे खूपच चर्चेत आला आहे. काळवीट शिकार केल्या प्रकरणी सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईंने माफी मग अन्यथा मारू अशी धमकी वजा इशारा दिला आहे. यातच आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध कास्टिंग दिग्दर्शक असणाऱ्या मुकेश छाबरा यांनी सलमानच्या सध्या राहणीबद्दल काही गोष्टी एका मुलाखतीदरम्यान मीडियासमोर सांगितल्या आहेत.

मुकेश छाबरा यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांसाठी विविध कलाकारांना कास्ट केले आहे. यात सलमान खान आणि शाहरुख खान यांचा देखील समावेश आहे. त्यांनी सलमान खानला बजरंगी भाईजान आणि ट्यूबलाइट अशा चित्रपटांसाठी कास्ट केले होते. मुकेश यांनी सलमानला खूपच जवळून पाहिले आहे. ते त्याच्या जवळच्या व्यक्तीमधील एक म्हणून देखील ओळखले जातात. नुकतीच त्यांनी यूट्यूब चॅनेलला एक मुलाखत दिली ज्यात त्यांनी सांगितले की, प्रसिद्ध होऊनही सलमान खानमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

मुकेश यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितले की, “सलमान खान हा एकमेव असा व्यक्ती आहे, जो नेहमीच उपलब्ध असतो. तो तुमच्यासाठी नेहमी उभा असतो. तो प्रामाणिक आहे, मात्र लोक त्याच्या प्रामाणिक पानाचा वेगळा अर्थ घेतात. सलमान खानचा एक मड असतो, तुम्हला तो नेहमीच चेक करावा लागतो की, आज त्याचा मुड कसा आहे. तो खूप साध्या घरात राहतो.”

मुकेश म्हणाले, “गॅलॅक्सी अपार्टमेंटमध्ये फक्त १ बीएचके फ्लॅटमध्ये ते राहतात. या देशाचा सर्वात मोठा सुपरस्टार सलमान खानच्या घरात फक्त १ सोफा, १ डायनिंग टेबल, छोटंसे जीम आहे. चैनीच्या वस्तूंची त्यांना आवड नाहीये. त्याला कोणत्याही ब्रँडचा शोक नाही. एका सामान्य माणसासारखे आयुष्य तो जगत असतो.” ते हे देखील म्हणाले की ते मागील १५ वर्षांपासून त्याच्या संपर्कात आहे, मात्र त्याच्यात अजूनपर्यंत कोणताही बदल झालेला नाही.

दरम्यान सलमान खानला बिश्नोईकडून आलेल्या धमकीमुळे मुंबई पोलिसांनी त्याच्या घरी आणि त्याला पोलीस सुरक्षा दिली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आरसी 15’च्या सेटवर प्रभुदेवाने राम चरणला दिले एक खास सरप्राईज, पाहा व्हिडिओ

कार्तिक आर्यन करणार लग्न? अभिनेत्याच्या घोषणेने उडाली खळबळ, जाणून घ्या कोण होणार नववधू

हे देखील वाचा