Saturday, June 29, 2024

‘तो केवळ तरुण अभिनेत्रींसोबतच काम करतो’, सलमानसोबत पुन्हा काम करण्याच्या प्रश्नावर भाग्यश्रीने दिले उत्तर

साल १९८९ च्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील पात्र देखील खूप गाजले होते, विशेष म्हणजे प्रेम आणि सुमन. प्रेम आणि सुमन ही पात्र इतकी गाजली की, प्रेक्षक आजही त्यांना त्याच नावाने ओळखतात. ‘मैंने प्यार किया’मधील प्रेम म्हणजे बॉलिवूडचा भाईजान सलमान खान. तर सुमन म्हणजे अभिनेत्री भाग्यश्री होय. या दोघांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले.

त्याचबरोबर अभिनेत्री भाग्यश्री काही दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामागचे कारणही तसेच आहे. भाग्यश्रीला पुन्हा एकदा सलमानसोबत काम करण्याची इच्छा असल्याचे तिने सांगितले आहे. भाग्यश्री असेही म्हणाली की, सलमान फक्त तरुण अभिनेत्रींसोबत काम करतो. (salman khan maine pyaar kiya co star bhagyashree opened up about the possibility of working with him again)

माध्यमांशी बोलताना भाग्यश्रीने सलमान खानसोबत पुन्हा काम करण्याविषयी आपले मत व्यक्त केले. भाग्यश्री म्हणाली की, “तिचे आणि सलमानचे बर्‍याच दिवसांपासून काहीही बोलणे झाले नाही. सलमानच्या जवळजवळ सर्वच चित्रपटात तरुण अभिनेत्री असतात.” भाग्यश्री पुढे असेही म्हणाली की, “चित्रपटाची कथा काही का असे ना फक्त तिला सलमान खान सोबत एकत्र काम करायची इच्छा आहे.”

खरं तर ‘मैंने प्यार किया’ हा भाग्यश्रीचा पहिला चित्रपट होता. त्याचबरोबर या चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केले होते. ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातील प्रेम आणि सुमन म्हणजेच सलमान आणि भाग्यश्री यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती.

मात्र या चित्रपटानंतर भाग्यश्रीने बॉलिवूडमध्ये फारसे काम केले नाही. तिने बराच काळ बॉलिवूडपासून ब्रेक घेतला होता. याच दरम्यान, सलमानची कारकिर्दीची गाडी वर्षानुवर्ष सुसाट धावत राहिली. त्याने या क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. तो आज इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. त्याचबरोबर, भाग्यश्री अलीकडेच कंगनाच्या ‘थलायवी’ या चित्रपटात दिसली. भाग्यश्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. यानंतर ती आगामी चित्रपट ‘राधे श्याम’ मधून पुन्हा एकदा चाहत्यांना भेटीला येणार आहे. ज्यामध्ये साऊथचा सुपरस्टार प्रभास आणि पूजा हेगडे दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच! कपाळी चंद्रकोर, नाकात नथ अन् केसात गजरा घालून स्मिता गोंदकर दिसतेय एकदम सुंदर

-‘पुरुषाचे शरीर’, म्हणणाऱ्या युजरला तापसी पन्नूचे खणखणीत प्रत्युत्तर; म्हणाली, ‘फक्त ही ओळ लक्षात ठेव…’

-लईच वाईट झालं! वयाच्या २५ व्या वर्षी मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघातात मृत्यू

हे देखील वाचा